विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करत उपनगरीय विभागांवर मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. मध्य आणि हार्बर लाईनवर रेल्वे ने मेगाब्लॉक घोषित केला आहे. या दरम्यान काही लोकलसेवा रद्द करण्यात आल्या आहेत तर काही उशिराने धावणार आहेत. त्यामुळे प्रवाशांनी रेल्वेचे वेळापत्रक पाहूनच मगच घराच्या बाहेर पडावे. (Railway Megablock)
माटुंगा-मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्ग सकाळी ११.३० ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.५२ ते दुपारी ३.५५ पर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान त्यांच्या संबंधित नियोजित थांब्यांनुसार डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील आणि निर्धारित वेळेच्या १५ मिनिटे उशिरा पोहोचतील. ठाण्यापुढील जलद गाड्या मुलुंड येथे डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. (Railway Megablock)
पनवेल- वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ वाजेपर्यंत
सकाळी १०.३३ ते दुपारी ३.४९ वाजेपर्यंत पनवेल येथून सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईहून पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा सकाळी ९.४५ ते दुपारी ३.१२ वाजेपर्यंत बंद राहतील.
(हेही वाचा : Jodhpur – Bhopal Express चे दोन डबे घसरले; अपघातामुळे रेल्वे वाहतूक प्रभावित)
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस शेवटची लोकल कधी
डाऊन हार्बर मार्गावर, ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी ९.३० वाजता सुटेल आणि १०.५० वाजता पनवेल येथे पोहोचेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सुटणाऱ्या ब्लॉकनंतरची पहिली लोकल दुपारी ३.१६ वाजता असेल आणि पनवेल येथे ४.३६ वाजता पोहोचेल.
ब्लॉक कालावधीत या मार्गावर विशेष लोकल
तर ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-वाशी भागावर विशेष लोकल धावतील.ब्लॉक कालावधीत ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाईन सेवा उपलब्ध असेल.ब्लॉक कालावधीत बेलापूर/नेरुळ आणि खारकोपर स्थानकांदरम्यान पोर्ट लाईन सेवा उपलब्ध असेल.
हेही पहा –