उन्हाळ्यात रेल्वेने प्रवास करताना प्रवाशांची तहान भागवण्यासाठी मध्य रेल्वेने (Centar Railway) पिण्याचे पाणी (Drinking Water) उपलब्ध करून देण्यासाठी पावले उचलली आहेत. यामध्ये स्थानकांवर पाण्याचे नळ, वॉटर कूलर, कूपनलिका इत्यादी समाविष्ट आहेत. त्यामुळे उन्हाळ्यात प्रवाशांना पिण्याच्या पाण्यासाठी रेल्वे स्थानकांत गैरसोय होणार नाही, असा विश्वास मध्य रेल्वेने व्यक्त केला आहे. (Railway Drinking Water)
(हेही वाचा – DRDO : स्वदेशी बनावटीचे अत्याधुनिक MPATGM ची चाचणी यशस्वी)
मध्य रेल्वेने आपल्या ४३४ रेल्वे स्थानकांवर ८ हजार ९३ पाण्याचे नळ, ४९८ वॉटर कुलर आणि १४९ कूपनलिकांची तरतूद करण्यात आली आहे. एप्रिल-मे महिन्यात कडक उन्हाळा आणि उष्णतेच्या लाटेमुळे रेल्वे स्थानकावरील पिण्याच्या पाण्याचा आढावा घेण्यात आला. यामध्ये पाण्याचा पुरेसा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने (Railway Ministry) विभागीय रेल्वेसाठी सूचना प्रसारित केल्या आहेत. त्यानुसार आता प्रवाशांना रेल्वे स्थानकावर पिण्यासाठी शुद्ध पाणी (Railway Filter water) उपलब्ध होईल, अशा उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. (Railway Drinking Water)
(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : मतदार जनजागृतीसाठी मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे स्वाक्षरी मोहीम )
काय आहेत सूचना ?
मुंबई विभागात १२०० पाण्याचे नळ असून, २४५ वॉटर कूलर आणि १० कुपनलिका उपलब्ध आहेत. हे सर्व वॉटर कुलर कार्यरत असल्याची खात्री करा, तसेच महत्त्वाच्या स्थानकांवर पाण्याचे टँकर तैनात करा. प्लॅटफॉर्मवर पाण्याची उपलब्धता करून स्थानकावर नियमित पाण्याची तपासणी करा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. (Railway Drinking Water)
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community