ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वे विस्कळीत

108
कार्यालयीन वेळेत गर्दीच्या काळात बुधवारी, २७ एप्रिल रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास कसारा येथे मालगाडीचे इंजिन बिघडल्यामुळे येथील मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. कसारा येथील वाशिंद आसनगाव या दरम्यान लोकलच्या मार्गावर हे इंजिन बंद पडल्यामुळे येथून जलद गतीचे लोकल मार्ग बंद झाले.
विशेष म्हणजे जेव्हा मालगाडीचे इंजिन बिघडले, तेव्हा ती वेळ कार्यालयीन वेळ होती. या वेळेत मुंबईहून कार्यालयातून सुटलेले हजारो कर्मचारी हे कसारा येथे घरी जाणासाठी निघाले, या हजारो कर्मचाऱ्यांना या घटनेचा फटका बसला आहे. कारण लोकल थांबल्याने तिथे जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय झाली आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.