गेल्या काही वर्षांपासून भारतीय रेल्वेने आधुनिकीकरणाची कास धरत प्रवाशांच्या सुविधेसाठी उद्वाहन, सरकते जिने, बॅग ऑन व्हील, बॅटरीची गाडी, बेस्ट ट्रॅव्हल ट्रॉली आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. मात्र यामुळे रेल्वे स्थानकातील हमालावर (Railway Hamal) बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळू लागली आहे.
विमानतळावर तसेच रेल्वे स्थानकांवर प्रवाशांसाठी सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. त्यात समान वाहून नेण्यासाठी अनेक कंत्राटदारांची नेमणूक केली आहे. तसेच बॅटरीवर धावणाऱ्या गाड्यांमधून प्रवाशांच्या बॅगा व इतर सामानाची वाहतूक केली जात असल्याने हमालांच्या रोजगारावरही परिणाम होत आहे. यासंदर्भात हमालांच्या (Railway Hamal) संघटनेने रेल्वेमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून हमालांची (Railway Hamal) भरती करावी, अशी मागणी केली आहे. त्याबाबत ऑल इंडिया रेल्वे लाल वर्दी कुली युनियनने रेल्वे व्यवस्थापकांना निवेदन दिले आहे. त्यामुळे हमालांची (Railway Hamal) आर्थिक संकटामुळे कोंडी झालेली पाहायला मिळत आहे.
हमालांच्या संघटनेने केलेल्या मागण्या
– रेल्वेने २००८ च्या शासन निर्णयानुसार हमालांना (Railway Hamal) रेल्वेच्या सेवेत सामावून घेणे
– स्थानकामध्ये कंत्राटी पद्धतीने बॅटरीवर धावणारी वाहने उपलब्ध करावी. तसेच त्या वाहनातून ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि रुग्णांना ने-आण करण्यास परवानगी द्यावी.
– या बॅटरीवर धावणाऱ्या वाहनातून बॅगा व इतर सामानाची वाहतूक करू नये.
Join Our WhatsApp Community