दक्षिण मध्य रेल्वे (SCR), दक्षिण पूर्व रेल्वे (SER) आणि उत्तर पश्चिम रेल्वेमध्ये (NWR)रिक्त जागा भरण्यासाठी रेल्वे भरती सेलने शिकाऊ पदांसाठी थेट भरती सुरू केली आहे. ७ हजार ९१४ जागांसाठी ही भरती होणार आहे.
( हेही वाचा : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार; प्रस्तावावर मंत्रिमंडळाची मोहोर )
अटी व नियम जाणून घ्या…
शैक्षणिक पात्रता –
उमेदवारांनी दहावी पास असणे आवश्यक आहे. मॅट्रिक्युलेशन ( मॅट्रिक्युलेट किंवा १०+२ परीक्षा उत्तीर्ण) तसेच ज्यांना ट्रेडमध्ये शिकाऊ उमेदवारी करायची आहे त्यांच्याकडे ITI प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
रिक्त जागांचा तपशील
- एकूण – ७ हजार ९१४ पदे
- SCR अप्रेंटिस – ४ हजार १०३
- SER अप्रेंटिस – २ हजार २६
- NWR अप्रेंटिस – १ हजार ७८५
वयोमर्यादा
उमेदवाराचे वय २४ वर्षांच्या आत असावे.
निवड प्रक्रिया
गुणवत्ता यादीतील कामगिरीनुसार उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
पगार
वेतनश्रेणी नियमांनुसार उमेदवारांना पगार दिला जाणार आहे.
कुठे कराल अर्ज?
इच्छुक उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी लिंक खालीलप्रमाणे…
१. http://34.93.184.238/instructions.php
२. http://iroams.com/RRCSER/applicationAfterIndex
३. https://rrcjaipur.in/
अर्ज शुल्क
Gen/OBS/EWS : १०० रुपये
SC/ST/PWD : शुल्क आकारले जाणार नाही.