रेल्वे प्रवाशांच्या मदतीला धावणार कर्मयोगी!

संपूर्ण भारतात रेल्वेचे जाळे विस्तारलेले आहे. परंतु काही जणांना रेल्वे प्रवासाची सवय नसते. गाडी कोणत्या प्लॅटफॉर्मवर थांबेल, आरक्षण असलेला डबा प्लॅटफॉर्मवर कुठे येईल यामुळे लोकांची तारांबळ उडते. अनेकदा रेल्वे प्रवासाची माहिती असलेल्या लोकांचा सुद्धा गोंधळ उडतो. तसेच तिकीट काढताना डिजीटल पेमेंट करण्यास काही अडचणी निर्माण झाल्या तरीही प्रवाशांना मार्गदर्शन करणारे कोणीही उपलब्ध नसते. याच पार्श्वभूमीवर रेल्वे महामंडळाने मोठा निर्णय घेतला असून प्रवाशांना होणारा त्रास आता कमी होणार आहे.

( हेही वाचा : दहावी पास आहात? सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, ३०२६ पदांची भरती )

कर्मयोगी सोडवणार समस्या 

रेल्वे प्रवाशांच्या या सगळ्या समस्या आता रेल्वे कर्मयोगी सोडवणार आहे. गाडी कोणच्या प्लॅटफॉर्मवर येईल, गाडीचा डबा कुठे येईल तसेच प्रवाशांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी रेल्वे मंत्रालय मोठ्या स्थानकांवर रेल्वे कर्मयोगी तैनात करणार आहे. आजवर ५० हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना याबाबतचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. याची माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैश्नव यांनी ट्वीट करत यासंदर्भात माहिती दिली आहे.

हे कर्मयोगी कसे मदत करणार?

रेल्वे प्रवाशांना मदत करण्यासाठी येत्या काळात एक लाख रेल्वे कर्मयोगी तयार केले जाणार आहे. लखनौ येथील इंडियन रेल्वे इंडियन रेल्वे इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सपोर्ट मॅनेटमेंटला रेल्वे कर्मयोगी प्रशिक्षणाची जबाबदारी देण्यात आली आहे. जर एखादा प्रवासी बुकिंग करत असेल त्याला फॉर्म भरता येत नसेल तर त्याला मदत करणे, गाडी कोणच्या प्लॅटरफॉर्मवर येणार याविषयी माहिती देणे, प्रवाशांचे सामान हरवल्यास, वेटिंग तिकिट असेल तर योग्य त्या डब्यात चढण्यास हे रेल्वे कर्मयोगी मदत करणार आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here