- विशेष प्रतिनिधी, मुंबई
मुंबई महापालिकेच्या (Mumbai Municipal Corporation) हद्दीतील नाल्यांची सफाई आतापर्यंत सुमारे ९६ टक्के झाली असली तरी अद्यापही रेल्वेच्या हद्दीतील नाल्यांची (Railway line desilting) व त्यावरील मोऱ्यांची अर्थात कल्व्हर्टची सफाई योग्य प्रकारे झालेली दिसून येत नाही, रेल्वे हद्दीतील कल्व्हर्टच्या सफाई कामाबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) यांनी पर्जन्य जलवाहिनी विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीमध्ये अतिरिक्त आयुक्त यांनी रेल्वेच्या हद्दीतील नाल्यांची सफाई योग्य प्रकारे झाली आहे किंवा नाही याची पुन्हा एकदा पाहणी करून त्याबाबतच्या पडताळणीचा अहवाल आपल्याला सादर केला जावा अशा प्रकारची निर्देश दिले असल्याची माहिती मिळत आहे. (Railway line desilting)
(हेही वाचा- Lok Sabha Election 2024 : कॉंग्रेसचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर, राहुल गांधींसमोरच २ नेते भिडले)
यंदाच्या पावसाळ्यात मुंबईची तुंबई होऊ नये यासाठी मुंबई महापालिकेने मुंबईतील नाल्यातील गाळ करण्याचे काम १८ मार्चपासून हाती घेतले. त्यानुसार बुधवार २२ मे पर्यंत ९६ टक्के काम पूर्ण झाले आहे. मुंबईतील नाल्यातील गाळ करण्याबरोबर रेल्वे हद्दीतील कल्व्हर्ट साफ करण्याचे काम केले जात आहे. यासाठी रेल्वे प्रशासनाला नालेसफाईचे पैसे अदा करण्यात आले आहे. त्यामुळे रेल्वे हद्दीतील नाले आणि त्यावरील कल्व्हर्ट यांची सफाई करण्याची जबाबदारी रेल्वे प्रशासनाची आहे. परंतु या केलेल्या कामावर प्रशासनाची देखरेख असते. परंतु अजूनही काही रेल्वे हद्दीतील नाल्यांची आणि कल्व्हर्ट सफाई झाली नसल्याची बाब समोर आली आहे. याबाबतच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर (Abhijeet Bangar) यांनी पर्जन्य जलवाहिनी विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यात त्यांनी रेल्वे हद्दीतील (Railway line desilting) नाल्यांची सफाई योग्य प्रकारे झाली आहे किंवा नाही याची खात्री करून घ्यावी,असे निर्देश संबधित अधिकाऱ्यांना दिले. (Railway line desilting)
कल्व्हर्ट मुंबईतील तीनही उपनगरीय रेल्वे मार्गांवर मिळून सुमारे ११६ कल्र्ट आहेत. तिन्ही रेल्वे हद्दीतील कल्हर्टर साफ झाले की नाही याची रोज पहाणी करावी तसेच साफ झाल्याचे सर्टीफाईज प्रमाणित करा असे निर्देश बांगर (Abhijeet Bangar) यांनी दिले. दरम्यान, वांद्रे पश्चिम येथील रेल्वेच्या हद्दीतील नाल्यांची पाहणी माजी नगरसेविका स्वप्ना म्हात्रे (Swapna Mhatre) यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांसह कल्व्हर्ट पाहणी केली. (Railway line desilting)
(हेही वाचा- Share Market fraud: झटपट श्रीमंत होण्याच्या नादात; शेयर मार्केटमध्ये बुडाले कोट्यवधी रुपये )
रेल्वे हद्दीतील नाल्यांची योग्य प्रकारे सफाई न झाल्यास आसपासच्या विभागात पाणी साचले जाते. परिणामी पावसाळ्यात रेल्वे मार्गावर पाणी जमा होऊन रेल्वे वाहतूक खोळंबली जाते. त्यामुळे रेल्वे वाहतूक सुरळीत राहावी, याकरता रेल्वे मार्गातील नाल्यांची योग्य प्रकारे सफाई व्हावी, याकडे महापालिका प्रशासन रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून योग्य प्रकारे लक्ष देत असते. (Railway line desilting)
कोणत्या रेल्वेखाली किती आहेत कल्हर्ट
पश्चिम रेल्वे – ४१
मध्य रेल्वे – ५३
हार्बर रेल्वे – २२
हेही पहा-
Join Our WhatsApp Community