RRB ALP Exam : तांत्रिक बिघाडामुळे सर्व्हरमध्ये अडचणी; रेल्वे लोको पायलट भरती परीक्षा रद्द

36
RRB ALP Exam : तांत्रिक बिघाडामुळे सर्व्हरमध्ये अडचणी; रेल्वे लोको पायलट भरती परीक्षा रद्द

रेल्वे भरती मंडळाने (Railway Recruitment Board, आरआरबी) १९ मार्च २०२५ या दिवशी नियोजित आरआरबी एएलपी सीबीटी २ ही परीक्षा (Railway Loco Pilot Recruitment) रद्द करण्याची अधिकृत घोषणा केली आहे. अनपेक्षित तांत्रिक समस्यांमुळे भारतभर अनेक परीक्षा केंद्रांवर परिणाम झाला आहे. शिफ्ट १ आणि शिफ्ट २ या दोन्ही परीक्षांमध्ये सर्व्हरशी संबंधित अडथळ्यांचा सामना करावा लागला, ज्यामुळे आर.आर.बी. ने सर्व परीक्षा रद्द केल्या आहेत. (RRB ALP Exam)

(हेही वाचा – Legislative Council Election : डावलेल्या इच्छुकांनी नाराजी झटकली; २१ जागांवर डोळा ठेवत सुरु केली आमदारकीची तयारी!)

परीक्षेच्या नव्या तारखेबाबत लवकरच अधिसूचना जारी केली जाईल, असे रेल्वे भरती मंडळाने स्पष्ट केले आहे. या रद्द होण्याच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांनी त्यांची मूळ प्रवेशपत्रे सुरक्षित ठेवावीत, तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

उमेदवारांना आवाहन !
  • या अतिरिक्त वेळेचा उपयोग पुन्हा परीक्षेसाठी तुमची तयारी बळकट करण्यासाठी करा.
  • आर.आर.बी.ने जारी केलेल्या कोणत्याही तांत्रिक सूचना किंवा मार्गदर्शक तत्त्वांची माहिती ठेवा.
  • परीक्षा केंद्र, तारीख आणि वेळेची माहिती मिळविण्यासाठी नवीन वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर तपशील तपासा.
  • अफवांवर विश्वास ठेवू नका; परीक्षेच्या नवीन तारखेच्या अधिकृत घोषणेची प्रतीक्षा करा.
  • पुनर्निर्धारित परीक्षेशी संबंधित माहिती तपासण्यासाठी आर.आर.बी.च्या संकेतस्थळाला नियमितपणे भेट द्या.
  • कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास स्पष्टीकरण आणि मदतीसाठी आर.आर.बी. हेल्पडेस्कशी संपर्क साधा.
  • तुमचे प्रवेशपत्र सुरक्षित ठेवा; कारण ते पुन्हा परीक्षेसाठी आवश्यक असेल. (RRB ALP Exam)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.