मध्य रेल्वेवर रविवारी (१८ फेब्रुवारी) विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्याकरिता उपनगरीय विभागांवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. ठाणे – कल्याण अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी १०.४० ते दुपारी ३.४० वाजेपर्यंत हा मेगा ब्लॉक असणार आहे. (Railway Mega Block)
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी ०९.३० ते दुपारी २.४५ पर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद/नीम-जलद लोकल ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील आणि त्यांच्या निर्धारीत थांब्यांव्यतिरिक्त कळवा, मुंब्रा आणि दिवा स्थानकांवर थांबतील व त्यांच्या नियोजित आगमनापेक्षा १० मिनिटांनी गंतव्यस्थानावर पोहोचतील.
कल्याण येथून सकाळी १०.२८ ते दुपारी ३.२५ पर्यंत सुटणाऱ्या अप जलद/अर्धजलद सेवा कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येऊन त्यांच्या संबंधित थांब्यांव्यतिरिक्त दिवा, मुंब्रा आणि कळवा स्थानकांवर थांबतील आणि मुलुंड स्थानकापासून पुढे अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि त्यांच्या निर्धारित वेळेच्या १० मिनिटे उशिरा गंतव्यस्थानी पोहोचतील.
(हेही वाचा – Restaurants With live Music: ‘या’ लोकप्रिय उपाहारगृहात घ्या संगीतासह भोजनाचा आनंद ! )
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/दादर येथून सुटणाऱ्या डाऊन मेल/एक्स्प्रेस गाड्या ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान पाचव्या मार्गावर वळवण्यात येतील.
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/दादर येथे येणाऱ्या अप मेल/एक्स्प्रेस गाड्या कल्याण आणि ठाणे/विक्रोळी स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गावर वळवण्यात येतील.
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-चुनाभट्टी/वांद्रे डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११.४० ते सायंकाळी ४.४० पर्यंत आणि चुनाभट्टी/वांद्रे-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई अप हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० वाजेपर्यंत असेल.
डाऊन हार्बर मार्गावरील सेवा बंद
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी ११.१६ ते सायंकाळी ४.४७ वाजेपर्यंत सुटणाऱ्या वाशी/बेलापूर/पनवेलसाठी डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.४८ ते सायंकाळी ४.४३ वाजेपर्यंत वांद्रे/गोरेगाव येथे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.
पश्चिम रेल्वेवरून प्रवास करण्याची परवानगी
पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई करीता सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी १०.४५ ते सायंकाळी ५.१३ पर्यंत सुटणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील. ब्लॉक कालावधीत पनवेल ते कुर्ला (फलाट क्र. ८) दरम्यान २० मिनिटांच्या वारंवारतेने विशेष सेवा चालवल्या जातील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत मुख्य मार्गावर आणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास करण्याची परवानगी आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community