मध्य रेल्वेवर रविवारी म्हणजेच ३ मार्च रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्याकरिता उपनगरीय विभागांवर मेगाब्लॉक (Railway Mega Block) घेण्यात येणार आहे. विद्याविहार आणि ठाणे दरम्यान पाचवी व सहावी लाईनवर सकाळी ८ ते दुपारी १२.३० वाजेपर्यंत हा ब्लॉक असणार आहे.
(हेही वाचा – BCCI : भारताच्या विजयानंतर जय शहा यांच्याकडून यांनी केली ची घोषणा)
जाणून घ्या ब्लॉकचे वेळापत्रक :
ब्लॉक कालावधीत लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) येथून सुटणाऱ्या/येणाऱ्या डाऊन आणि अप मेल/एक्सप्रेस गाड्या विद्याविहार आणि ठाणे (Railway Mega Block) स्थानकांदरम्यान अनुक्रमे डाऊन आणि अप जलद मार्गांवर वळवण्यात येतील आणि नियोजित वेळेपेक्षा १० ते १५ मिनिटे उशिराने चालतील.
मानखुर्द ते नेरुळ दरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११.१५ ते दुपारी ४.१५ वाजेपर्यंत हा ब्लॉक असेल.
या सेवा रद्द :
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.१८ ते दुपारी ३.२८ पर्यंत पनवेल/बेलापूर/वाशी येथे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी १०.३७ ते दुपारी ३.४५ या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. (Railway Mega Block)
(हेही वाचा – Amit Shah : सहकार क्षेत्राशी संबंधित सर्व माहिती आता एका क्लिकवर उपलब्ध होणार)
डाऊन हार्बर लाईन :
पनवेलसाठी ब्लॉकपूर्वी शेवटची लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.१४ वाजता सुटेल. तर वाशीसाठी ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.१८ वाजता सुटेल. तसेच पनवेलसाठी ब्लॉकनंतरची पहिली लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून दुपारी ३.३६ वाजता सुटेल. (Railway Mega Block)
अप हार्बर लाईन :
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल पनवेल येथून सकाळी १०.३३ वाजता सुटेल. तर ब्लॉकनंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी पहिली लोकल वाशी येथून दुपारी ४.१९ वाजता सुटेल. तसेच ब्लॉकनंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी पहिली लोकल पनवेल येथून सायंकाळी ४.१० वाजता सुटणार आहे. (Railway Mega Block)
विशेष उपनगरीय गाड्या चालविण्यात येतील :
ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-मानखुर्द सेक्शनवर विशेष गाड्या चालविण्यात येतील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी १०.०० ते दुपारी ४.३० या कालावधीत ट्रान्स हार्बर/मुख्य मार्गांवर प्रवास करण्याची परवानगी आहे. (Railway Mega Block)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community