Railway Minister Ashwini Vaishnav: वंदे भारत ट्रेनची परदेशात मागणी, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती

एका कार्यक्रमात बोलताना अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, आता भारतीय रेल्वे वंदे भारत ट्रेनच्या निर्यातीवर काम करत आहे. वंदे भारत ट्रेनची संकल्पना आणि प्रत्यक्षात परिचालन यासंदर्भात बोलताना वंदे भारत ट्रेनच्या निर्यातीबाबत त्यांनी प्रतिक्रिया दिली.

202
Railway Minister Ashwini Vaishnav: वंदे भारत ट्रेनची परदेशात मागणी, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती
Railway Minister Ashwini Vaishnav: वंदे भारत ट्रेनची परदेशात मागणी, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती

वंदे भारत ट्रेनचे स्लीपर व्हर्जन लवकरच सादर केले जाणार आहे. यावर वेगाने काम सुरू आहे. विद्यमान वंदे भारत एक्स्प्रेसला प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद मिळत असून, आणखी काही मार्गांवर वंदे भारत ट्रेन प्रवाशांसाठी सेवेत दाखल होणार असल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Railway Minister Ashwini Vaishnav) यांनी दिली.

वंदे भारत ट्रेनच्या निर्यातीवर काम सुरू
एका कार्यक्रमात बोलताना अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, आता भारतीय रेल्वे वंदे भारत ट्रेनच्या निर्यातीवर काम करत आहे. वंदे भारत ट्रेनची संकल्पना आणि प्रत्यक्षात परिचालन यासंदर्भात बोलताना वंदे भारत ट्रेनच्या निर्यातीबाबत त्यांनी प्रतिक्रिया दिली. सध्या देशभरात ८२ वंदे भारत एक्सप्रेस सुरू आहेत तसेच वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनची गती आणखी वाढण्यावर भर दिला जात आहे याशिवाय नवी दिल्ली-मुंबई आणि नवी दिल्ली-हावडा या मार्गांवर चालवल्या जात असलेल्या वंदे भारत ट्रेनचा वेग ताशी १६० किमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे रेल्वेमंत्र्यांनी सांगितले.

परदेशातून वंदे भारत ट्रेनची मागणी
वंदे भारत ट्रेनचे स्वदेशी डिझाइन आणि कार्यक्षमतेने तयार करण्यासाठी रेल्वे मंत्रालय सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील युनिट्सव्यतिरिक्त फॅक्टरीतील कामकाज सक्षम करत आहे. देशात वंदे भारत ट्रेन तयार करणे मोठे आव्हान होते, मात्र ते आव्हान आम्ही आता पेलले आहे. आपल्या देशातील इंजिनियर्सच्या मदतीने हे आव्हान पेलले जाणार आहे. अनेक देशांना वंदे भारत ट्रेन हवी आहे. त्यामुळे भारत इतर देशांना वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन निर्यात करण्यास सक्षम असेल, असा विश्वास रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केला.

वंदे भारत ट्रेनमध्ये महत्त्वाचे बदल
वंदे भारत ट्रेनमध्ये बदल केले जात आहेत. स्लीपर वंदे भारत ट्रेनचे काम प्रगतीपथावर आहे, अशी माहिती अश्विनी वैष्णव यांनी दिली. प्रवाशांच्या सोयी-सुविधा आणि संरक्षणासाठी वंदे भारत ट्रेनमध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.