Railway Minister Ashwini Vaishnav: नाशिक-मुंबई दरम्यानची रेल्वे कनेक्टिव्हिटी सुधारणार, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची लोकसभेत माहिती

घाटाची खाडी, चढण टाळण्याचे अनेक पर्याय आहेत.

157
Railway Minister Ashwini Vaishnav: नाशिक-मुंबई दरम्यानची रेल्वे कनेक्टिव्हिटी सुधारणार, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची लोकसभेत माहिती
Railway Minister Ashwini Vaishnav: नाशिक-मुंबई दरम्यानची रेल्वे कनेक्टिव्हिटी सुधारणार, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची लोकसभेत माहिती

नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी ते ठाणे जिल्ह्यातील कसारादरम्यानच्या कसारा घाट विभागात नवीन ट्रॅक टाकण्याकरिता तंत्रज्ञानाचा वापर करणार असल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Railway Minister Ashwini Vaishnav) यांनी सांगितलं. मध्य रेल्वेतील कसारा घाट हा देशातील सर्वात उंच उतारांपैकी एक आहे.

याबाबत नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी बुधवारी लोकसभेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तरे देताना ते बोलत होते. जेव्हा नवीन ट्रॅक घातला जाईल, तेव्हा ग्रेडियंट लक्षणीयरित्या कमी होईल. त्यामुळे गाड्यांची जलद वाहतूक होण्यास मदत होईल. सध्या तीव्र उतारामुळे मुंबई-नाशिकदरम्यान बाजूने जाणाऱ्या गाड्या दुहेरी इंजिनने धावतात, असे त्यांनी सांगितले.

सध्या गाड्यांना घाटावर चढण्यासाठी किंवा घाट विभागात उतरताना गाड्यांचा वेग धरून ठेवण्यासाठी आणि कमी करण्यासाठी अतिरिक्त इंजिनांची आवश्यकता असते, अशी माहिती मध्य रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

(हेही वाचा – Railway Minister Ashwini Vaishnav: नाशिक-मुंबई दरम्यानची रेल्वे कनेक्टिव्हिटी सुधारणार, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची लोकसभेत माहिती)

लवकरच अंतिम निर्णय…
रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, हा ग्रेडियंट सुमारे १:६० किंवा त्यापेक्षा सहज चढवता किंवा उतरवता येईल. सध्या याचे अंतिम स्थान सर्वेक्षण सुरू आहे. रेल्वेमार्गाचे काम करावे लागणार असल्याने थोडा वेळ लागेल. घाटाची खाडी, चढण टाळण्याचे अनेक पर्याय आहेत. घाटांभोवती रुळ टाकणे त्यात जास्त अंतराचा प्रवास करणे, समृद्धी एक्स्प्रेस वेवर घाट विभाग ओलांडण्यासाठी बोगदे बांधणे याबाबत लवकरच अंतिम निर्णय होईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

कसारा घाट विभागात खडी उतार कमी करण्याची योजना
नवीन मार्ग आणि रुंद बोगद्यांद्वारे ही कनेक्टिव्हिटी समस्या सोडवली जाईल. हे दररोज प्रत्येक दिशेने प्रवास करणाऱ्या १५० गाड्यांचा सुमारे ४५ मिनिटांचा प्रवास वेळ वाचवेल. सध्या इगतपुरी आणि कसारा स्थानकांदरम्यान १६ किमी लांबीच्या गाड्यांसाठी ६ बोगदे आहेत. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी इगतपुरी आणि कसारा दरम्यान देशातील सर्वात उंच भागांपैकी एक असलेल्या कसारा घाट विभागात खडी उतार कमी करण्याची योजना जाहीर केली.

हेही पहा – 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.