रेल्वेच्या कारखान्यातून पलंग आणि खुर्च्या चोरल्याच्या प्रकरणात रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्याच्या विरोधात ११ वर्षांनंतर गुन्हा नोंदवण्याचा आदेश विशेष रेल्वे न्यायालयाने दिला. (Railway Officer) या प्रकरणी रेल्वेचे कर्मचारी कप्तान सिंह यांनी सांगितले की, १९ सप्टेंबर २०१४ ला रात्री सिथौली (Gwalior, ग्वालियर) येथील रेल्वे स्प्रिंग कारखान्याच्या गेस्ट हाऊसमधून पलंग आणि ४ खुर्च्या वरिष्ठ अधिकारी विवेक प्रकाश त्यांच्या बंगल्यावर नेत होते.
(हेही वाचा – Weather Update : ऐन लग्नसराईत उन्हाचा पारा वाढला; हवामान विभागाचा अंदाज काय सांगतो? वाचा )
विवेक प्रकाश (Vivek Prakash) यांना याविषयी विचारले असता अनुमती घेऊन साहित्य नेत असल्याचे त्यांनी सांगितले; मात्र हा प्रकार संशयास्पद वाटल्याने त्याची चौकशी केली. तेव्हा बनावट गेटपास घेऊन रेल्वेची संपत्ती ते चोरत असल्याचे उघड झाले. याची वरिष्ठ अधिकार्यांकडे तक्रार केली; परंतु कारवाई न झाल्याने विशेष रेल्वे न्यायालयात तक्रार केली. त्यावर वर्ष २०२५ मध्ये विजय प्रकाश यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्याचा आदेश न्यायालयाने दिला.
माझे वरिष्ठ अधिकारी विजय प्रकाश यांच्याशी कोणतेही वैयक्तिक वैर नाही. रेल्वेची संपत्ती अशी घेऊन जाणे गुन्हा आहे. एखादा वरिष्ठ अधिकारीच असे करत असेल, तर प्रकरण आणखी गंभीर होते. नियम-कायदे केवळ सामान्यांसाठी आहेत का ?, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. (Railway Officer)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community