रेल्वेने प्रवास करत बाहेरगावी किंवा गावी जाताना प्रवासी आपल्यासोबत मोठ-मोठ्या बॅगा घेऊन जात असतात. इतकंच नाही तर गावहून येताना अनेकदा वर्षभराचं रेशन, विविध फळांच्या पेट्या आणल्या जातात. यामुळे या सामानाचं वजन प्रमाणाच्या बाहेर होतं. पण आता अशा जादा वजनाच्या वस्तूंची ने-आण करण्यावर रेल्वेकडून बंधने घालण्यात आली आहेत.
त्यामुळे विमानातून प्रवास करताना ज्याप्रमाणे सामानावर वजनाची मर्यादा असते, त्याप्रमाणेच रेल्वेने प्रवास करताना देखील लगेजच्या वजनावर मर्यादा आणण्याचा निर्णय रेल्वेकडून घेण्यात आला असून, लवकरच त्याची काटेकोर अंमलबजावणी देखील करण्यात येणार आहे.
(हेही वाचाः EPFO Interest Rate: PF च्या व्याजदरात 43 वर्षांतील सर्वात मोठी घसरण)
इतक्या वजनाचं सामान मोफत
रेल्वेने प्रवास करताना वेगवगेळ्या श्रेणींच्या डब्यांमधून सामान नेण्यासाठी रेल्वेकडून मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. साधारणपणे 40 ते 70 किलो वजनापर्यंतचे लगेज प्रवाशांना मोफत नेता येते. पण यापेक्षा जास्त वजनाचे सामान न्यायचे असेल तर प्रवाशांना आता अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत.
…तर अधिकचा दंड आकारला जाणार
स्लिपर कोचमधील प्रवाशांना 40 किलो, एसी टू टीयर कोचमधून 50 किलो, तर फर्स्ट क्लास एसीमधून सर्वात जास्त 70 किलो वजनाचे सामान नेण्याची मुभा आहे. पण यापेक्षा जास्त वजनाचे सामान नेणारा प्रवासी आढळला तर त्याला बॅगेज रेटच्या सहा पट अधिक दंड आकारला जाणार आहे.
(हेही वाचाः Income Tax भरताना आता ही माहिती सुद्धा द्यावी लागणार, आयकर विभागाचे नवे नियम)
Join Our WhatsApp Community