रेल्वेची आरक्षण प्रणाली पाच तास बंद

येत्या रविवारी रात्रीपासून ते सोमवार पहाटे सव्वा चार वाजेपर्यंत या कालावधीत मुंबई प्रवाशी आरक्षण प्रणाली (पॅसेंजर रिझर्वेशन सिस्टम -पीआरएस) ही देखभालीसाठी बंद राहणार आहे. पीएनआर फाइल कॉम्प्रेशनसाठी रविवारी, ८ मे २०२२ रोजी २३.४५ ते ९ मे २०२२ रोजी पहाटे ०४.१५ वाजेपर्यंत पॉवर ब्लॉक असेल.

इंटरनेट बुकिंग उपलब्ध होणार नाही

या कालावधीत आयव्हीआरएस, चालू आरक्षण, रिफंड काउंटर आणि कोचिंग रिफंड टर्मिनल इत्यादी उपलब्ध होणार नाहीत. परंतु विद्यमान परतावा नियमांनुसार परताव्यासाठी टीडीआर जारी केला जाईल. या कालावधीत मुंबई प्रवाशी आरक्षण प्रणाली (पॅसेंजर रिझर्वेशन सिस्टम -पीआरएस) यंत्रणेतील गाड्यांसाठी इंटरनेट बुकिंग उपलब्ध होणार नाही, असे रेल्वे प्रशासनाने कळवले आहे. प्रवासी तथा रेल्‍वे वापरकर्त्‍यांनी या महत्वाच्या विद्युत देखभालीच्‍या कामासाठी रेल्‍वे प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

(हेही वाचा नालेसफाईच्या कामांची नौटंकी होणार बंद! सफाईबाबत शंका आहे तर करा ‘या’ लिंकवर क्लिक)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here