रेल्वे पोलिसांनी १ हजार ३९९ बालकांची पालकांशी घडवून आणली भेट

रेल्वे स्थानक आणि परिसरात बालके हरवण्याची प्रकार अनेकदा घडत असतात. अशा वेळी त्या बालकांची जबाबदारी रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) कडे येते. पण हरवलेला बालकांना पालकांशिवाय किती दिवस ठेवणार, हा प्रश्न आहेच. त्यामुळे रेल्वे पोलिसांनी १ हजार ३१९ बालकांची त्यांच्या पालकांशी भेट घडवून आणली आहे. त्यामध्ये मुंबईच्या आरपीएफ पथकाने सर्वाधिक ६१५ हरवलेल्या मुलांची त्यांच्या कुटुंबीयांसोबत पुन्हा भेट घडवून आणली.

जानेवारी ते डिसेंबर २०२३ या कालावधीत ‘आरपीएफ’ने ‘नन्हे फरिश्ते’ हा उपक्रम राबवला. या उपक्रमांतर्गत रेल्वे स्थानक तसेच परिसरात सापडलेल्या मुलांना आधार देण्याचे काम आरपीएफकडून करण्यात आले. यावेळी स्थानकांवरील आरपीएफ चाइल्डलाइन या स्वयंसेवी संस्थेचीदेखील योग्य मदत झाली. घरगुती वाद, मुंबईचे आकर्षण, परिणामांचा विचार न करता उचललेले पाऊल या प्रमुख कारणांमुळे मुले घर सोडतात, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.

(हेही वाचा आसाममध्ये हिंदूंच्या घरवापसीला वेग; ११ कुटुंबातील ४३ जणांचा हिंदू धर्मात पुनर्प्रवेश)

मध्य रेल्वे स्थानक परिसरात हरवलेल्या मुलांशी संपर्क साधून, त्यांच्या समस्या समजून घेऊन आणि त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचवण्यापर्यंतची जबाबदारी आरपीएफकडून पूर्ण केली जाते. अनेकदा बालकांना विश्वासात घेण्यासाठी किंवा घाबरलेल्या अवस्थेत असलेल्या बालकांचे समुपदेशन केले जाते. रेल्वे स्थानक, रेल्वे गाडीत किंवा स्थानक परिसरात अशी बालके आढळल्यास तातडीने आरपीएफशी संपर्क साधावा, असे आवाहन आरपीएफकडून करण्यात आले आहे.

विभागनिहाय पालकांकडे सोपवलेल्या बालकांचा आढावा

  • मुंबई : ६१५ बालके (४४१ मुले आणि १७४ मुली)
  • भुसावळ : २८४ बालके (१५० मुले आणि १३४ मुली)
  • पुणे : २८५ बालके (२३३ मुले आणि ५२ मुली)
  • नागपूर : १५७ बालके (८९ मुले आणि ६८ मुली)
  • सोलापूर विभाग : ५८ बालके (३६ मुले आणि २२ मुली)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here