बारावी पास आहात? रेल्वे पोलीस विभागात नोकरीची संधी; परीक्षेविना केली जाणार निवड

137

नागपूर लोहमार्ग पोलिसात लवकरच रिक्त पदांची भरती करण्यात येणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पोलीस शिपाई चालक या पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर २०२२ ही असणार आहे.

( हेही वाचा : Reel करा पैसे मिळवा ते शेड्यूल करून पोस्ट करा; काय आहेत इन्टाग्रामचे नवे भन्नाट फिचर्स?)

नियम व अटी जाणून घ्या…

पोलीस शिपाई चालक – २८ जागा

शैक्षणिक पात्रता

या पदांसाठी उमेदवाराचे बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण असणे आवश्यक आहे. तसेच विद्यार्थ्याचे शिक्षण मान्यताप्राप्त विद्यापीठातून झालेले हवे, तसेच उमेदवारांना संबंधित पदाचा अनुभव असणे गरजेचे आहे.

शारीरिक पात्रता

  • उंची – महिला – १५८ से.मी. पेक्षा कमी नसावी, पुरुष – १६५ से.मी. पेक्षा कमी नसावी.
  • छाती – पुरूषांसाठी – न फुगवता ७९ से.मी. पेक्षा कमी नसावी.

आवश्यक कागदपत्रे

बायोडाटा, दहावी-बारावी आणि पदवीची शैक्षणित प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला, ओळखपत्र, पासपोर्ट साईज फोटो

या पदभरतीसाठी https://policerecruitment2022.mahait.org/Forms/Home.aspx या लिंकवर Apply करा.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.