रेल्वेमध्ये नोकरी मिळवणे हे अनेकांचे स्वप्न असते. त्यासाठी अनेक जण इच्छुक देखील असतात. रेल्वेने आता 12वी पास आणि पदवीधर खेळाडूंसाठी भरती सुरू केली आहे. त्यामुळे रेल्वेत नोकरी मिळवण्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. पश्चिम रेल्वेकडून स्पोर्ट्स कोट्याअंतर्गत लेव्हेल 2,3,4 आणि 5 या पदांसाठी अर्ज मागवले आहेत. पात्र उमेदवारांनी पश्चिम रेल्वेची अधिकृत वेबसाईट rrcwr.com वर ऑनलाईन अर्ज करायचा आहे.
21 रिक्त पदे
पश्चिम रेल्वेकडून नुकतीच रेल्वे भरतीसाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. ज्याद्वारे स्पोर्ट्स कोट्यातील नोकर भरतीचा समावेश आहेय 5 सप्टेंबरपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून 4 ऑक्टोबरपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार आहे. स्पोर्ट्स कोट्यांतर्गत एकूण 21 रिक्त पदे भरण्यात येणार असून, लेव्हल 2 आणि 3 च्या 16, तर 4 आणि 5 च्या 5 जागांचा समावेश आहे.
16 रिक्त पदे लेव्हल 2 आणि 3
वेटलिफ्टिंग(पुरुष)- 2
पॉवरलिफ्टिंग(पुरुष)- 1
पॉवरलिफ्टिंग(महिला)-1
कुस्ती(पुरुष)-1
नेमबाजी(पुरुष किंवा महिला)-1
कबड्डी(पुरुष आणि महिला)-3
हॉकी(पुरुष)-1
जिमनॅस्टिक(पुरुष)-2
क्रिकेट(पुरुष)-2
क्रिकेट(महिला)-1
पोस्ट बॉल बॅडमिंटन-1
5 रिक्त पदे लेव्हल 4 आणि 5
कुस्ती(पुरुष)फ्री स्टाईल-1
नेमबाजी(महिला आणि पुरुष)-1
कबड्डी(पुरुष)-1
हॉकी(पुरुष)-2