सरकारी नोकरी आणि विशेषत: रेल्वेत नोकरी करू इच्छिणाऱ्या तरूणांसाठी आनंदाची बातमी आहे. रेल्वे सुरक्षा दलाने कॉन्स्टेबल आणि सहाय्यत उपनिरीक्षक (ASI) पदाच्या ९ हजार ५०० रिक्त जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. यासाठी १२ वी पास ते पदवीधर उमेदवार rpf.indianrailways.gov.in या रेल्वे सुरक्षा दलाच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात.
( हेही वाचा : एसटी महामंडळाने ५ हजार कंत्राटी चालकांची भरती प्रक्रिया केली रद्द; काय आहे कारण)
९५०० पदांसाठी भरती
- यामध्ये लेखी परीक्षा, कागदपत्रे पडताळणी आणि मुलाखतीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे. उमेदवारांना अर्ज करण्यासाठी पात्रता प्रमाणपत्र, आधार कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र, ड्रायव्हिंग लायसन, पॅनकार्ड इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत.
- अर्ज करण्यासाठी उमेदवार कॉनस्टेबल पदासाठी १२ वी पास आणि सहाय्यक उपनिरीक्षक पदासाठी पदवीधर असणे आवश्यक आहे.
- रेल्वे भरतीमध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवारांची किमान वयोमर्यादा १८ वर्षे आणि कमाल वयोमर्यादा ३५ वर्षे असावी. या भरतीसाठी उमेदवारांना १०० रुपये शुल्क भरावे लागणार आहे.
ईस्टर्न रेल्वेतही नोकरीची संधी
रेल्वेमध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्या तरूणांसाठी आनंदाची बातमी आहे. रेल्वेमध्ये अप्रेंटिस पदांसाठी भरती सुरू झाली आहे. लवकरच फिटर, वेल्डर, इलेक्ट्रिशियन, मशिनिस्ट, कार्पेंटर, पेंटर अशी अनेक ट्रेडमध्ये ३ हजारांहून अधिक पदे भरली जाणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार ईस्टर्न रेल्वेच्या er.indianrailways.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करू शकतात.
ईस्टर्न रेल्वे अप्रेंटिस भरती २०२२ साठी अर्ज करण्याची प्रक्रिया ही ३० सप्टेंबर २०२२ पासून सुरू झाली असून पात्र उमेदवार २९ ऑक्टोबर किंवा यापूर्वी ऑनलाइन अर्ज करू शकतात. केवळ ऑनलाइन पद्धतीने भरलेले अर्जच स्वीकारले जाणार आहेत.
Join Our WhatsApp Community