उन्हाळ्यात सुट्यांमुळे बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी रेल्वे गाड्यांमध्ये होते. प्रवाशांना अनेकदा आरक्षित तिकीट न मिळाल्याने गर्दीतून प्रवास करावा लागतो. शाळा-महाविद्यालयांना उन्हाळ्यात सुट्ट्या असल्याने अनेक लोक गावची वाट धरतात. याच पार्श्वभूमीवर त्यामुळे रेल्वेने उन्हाळ्यात सात विशेष गाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे. या गाड्या १९ जूनपर्यंत सोडल्या जाणार असून, त्यांच्या एकूण ८८ फेऱ्या होणार आहेत.
( हेही वाचा : उष्णतेच्या लाटेचा इशारा! पारा ४० अंशावर, ‘या’ जिल्ह्यात सर्वाधिक तापमान )
विशेष गाड्यांचे नियोजन खालीलप्रमाणे असेल…
- पुणे ते दानापूर या साप्ताहिक गाडीच्या १४ फेऱ्या होणार आहेत.
- पुणे ते एर्नाकुलम या साप्ताहिक गाडीच्या १४ फेऱ्या होतील.
- मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथूनही काही विशेष गाड्या सोडल्या जातील.
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते नागपूर या साप्ताहिक गाडीच्या दहा फेऱ्या होणार आहेत.
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मालदा या साप्ताहिक गाडीच्या दहा फेऱ्या होतील.
- लोकमान्य टिळक टर्मिनस ते करमाळी साप्ताहिक गाडीच्या १६ फेऱ्या होणार आहेत.
- लोकमान्य टिळक टर्मिनस ते बनारस या साप्ताहिक गाडीच्या १२ फेऱ्या होणार आहेत. लोकमान्य टिळक टर्मिनस ते समस्तीपूर या साप्ताहिक गाडीच्या १२ फेऱ्या होतील.