सुट्टीच्या दिवशी अनेक जण फिरण्यासाठी घराबाहेर पडतात, पण दर रविवारी मुंबईत लोकलचा मेगाब्लॉक असल्यामुळे प्रवाशांचा खोळंबा होतो. मध्य रेल्वे, मुंबई विभागात रविवार २७ फेब्रुवारी रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मेगाब्लॉक असणार आहे.
या मार्गावर मेगाब्लॉक
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-विद्याविहार अप आणि धीम्या मार्गावर सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०.४८ ते दुपारी ३.४९ या वेळेत सुटणाऱ्या डाउन धिम्या मार्गावरील गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील या लोकल गाड्या सँडहर्स्ट रोड, चिंचपोकळी, करी रोड, विद्याविहार स्थानकांवर थांबणार नाहीत.
- घाटकोपर येथून सकाळी १०.४१ ते दुपारी ३.५२ पर्यंत सुटणाऱ्या गाड्या विद्याविहार ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि विद्याविहार, करी रोड, चिंचपोकळी, सँडहर्स्ट रोड आणि मस्जिद येथे थांबणार नाहीत.
- पनवेल- वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११.०५ ते सायंकाळी ४.०५ पर्यंत (ठाणे-वाशी/नेरुळ आणि बेलापूर/नेरुळ-खारकोपर सेवा प्रभावित होणार नाहीत)
- पनवेल येथून सकाळी १०.३३ ते दुपारी ३.४९ वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी ९.४५ ते दुपारी ३.१२ या वेळेत पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.
(हेही वाचा धर्म घराबाहेर येणं योग्य आहे का? काय आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे मत)
- पनवेल येथून सकाळी ११.०२ ते दुपारी ३.५३ वाजेपर्यंत ठाण्याकडे जाणारी अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि सकाळी १०.०१ ते दुपारी ३.२० वाजेपर्यंत पनवेल येथून ठाण्याकडे जाणारी ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.
- ब्लॉक कालावधीत बेलापूर ते खारकोपर/नेरुळ दरम्यानच्या उपनगरीय रेल्वे सेवा वेळापत्रकानुसार चालविण्यात येतील.
- ब्लॉक कालावधीत ठाणे – वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा उपलब्ध असेल.
- ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई- वाशी भागावर विशेष उपनगरीय गाड्या धावतील.
प्रशासनाने केली व्यक्त दिलगिरी
हा मेंटेनन्स मेगा ब्लॉक पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत. प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासन दिलगिरी व्यक्त केली आहे.
Join Our WhatsApp Community