रेल्वेकडून 2024 वर्षात 6450 किमी Railway Track चे नूतनीकरण

69
रेल्वेकडून 2024 वर्षात 6450 किमी Railway Track चे नूतनीकरण
रेल्वेकडून 2024 वर्षात 6450 किमी Railway Track चे नूतनीकरण

भारतीय रेल्वेने 2024 मध्ये 6450 किलोमीटर ट्रॅकचे (Railway Track) नूतनीकरण 8550 किलोमीटर ट्रॅकचे टर्नआउट नूतनीकरण. तसेच रेल्‍वेच्‍या प्रमुख विभागांमध्‍ये 130 किमी प्रतितास वेग वाढवला आहे. रेल्‍वे मंत्रालयाने आज, रविवारी सादर केलेल्या आपल्‍या अहवालात ही माहिती नमूद केली आहे. भारतीय रेल्‍वेने या वर्षी देशभरातील 3210 किलोमीटर ट्रॅकचे विद्युतीकरण केले. विद्युतीकृत ब्रॉडगेज (बीजी) नेटवर्क 97 टक्क्यांपर्यंत वाढवले ​​आणि अक्षय ऊर्जा क्षमता 2014 मेगावॅटपर्यंत पोहोचली आहे. वर्षभरात विक्रमी 136 वंदे भारत (Vande Bharat) गाड्या आणि पहिली नमो भारत रॅपिड रेल्वे (Namo Bharat Rapid Railway) सुरू करण्यात आली, तसेच पीक सीझनमध्ये 21 हजार 513 विशेष ट्रेन ट्रिपही सादर करण्यात आल्या, असे पुनरावलोकन अहवालात नमूद करण्यात आले आहे.

(हेही वाचा – Koneru Humpy यांनी पटकावले वर्ल्ड रॅपिड बुद्धीबळ चॅम्पियनशिपचे विजेतेपद)

यासोबतच सुमारे 10 हजार लोको कवच सुरक्षा तंत्रज्ञानाने सुसज्ज आहेत. रेल्वे नेटवर्कवरील सुरक्षितता सुधारण्यासाठी आधुनिकीकरण मोहिमेचा एक भाग म्हणून 15 हजार किलोमीटर मार्गासाठी बोली मागविण्यात आल्या आहेत, असेही या अहवालात स्‍पष्‍ट करण्‍यात आले आहे. ईस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर (EDFC) आणि वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर (WDFC) द्वारे 72 हजारांहून अधिक ट्रेन धावण्याची सुविधा देऊन कमाई वाढवण्यासाठी 2024 मध्ये रेल्वेने 1473 दशलक्ष टन मालवाहतूक देखील केली.अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत 1337 स्थानकांपैकी 1198 स्थानकांच्या पुनर्विकासाचे काम सुरू झाले. इतर स्थानके निविदा आणि नियोजनाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आहेत. देशभरातील रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासामुळे रोजगार निर्मिती आणि सुधारित आर्थिक वृद्धीसह अर्थव्यवस्थेवर सकारात्‍मक परिणाम होतील, असा विश्‍वासही पुनरावलोकन अहवालात व्‍यक्‍त करण्‍यात आला आहे. भारतीय रेल्‍वेने देशातील 80 स्‍थानांसह 78 हेरिटेज साइट्सचे डिजीटलीकरण केले, तर घूमसारख्या सणांनी पर्यटनाला चालना दिली आहे. एकूण 208 कोटी रुपये खर्चून हत्तींचा अपघात रोखण्यासाठी एनएफआर (ईशान्य फ्रंटियर रेल्वे) मधील गंभीर संवेदनशील ठिकाणी नो एलिफंट इंट्रुजन डिटेक्शन सिस्टम (ईआयडीएस) देखील कार्यान्वित करण्यात आल्‍याचेही या अहवालात स्‍पष्‍ट करण्‍यात
आले आहे. (Railway Track)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.