Railway track: रेल्वेमार्गावरील घातपाताचे कारस्थान रोखण्यासाठी ‘ट्रॅक मित्र’ अभियान सुरू; RPF आणि GRP चा नवीन उपक्रम

121
Railway track: रेल्वेमार्गावरील घातपाताचे कारस्थान रोखण्यासाठी ‘ट्रॅक मित्र’ अभियान सुरू; RPF आणि GRP चा नवीन उपक्रम
Railway track: रेल्वेमार्गावरील घातपाताचे कारस्थान रोखण्यासाठी ‘ट्रॅक मित्र’ अभियान सुरू; RPF आणि GRP चा नवीन उपक्रम

गेल्या काही महिन्यांपासून, सुरक्षा यंत्रणांनी देशाच्या विविध भागात रेल्वे रुळांवर (Railway track) नको असलेल्या वस्तू ठेवून गाड्या रुळावरून उतरवण्याचे प्रयत्न रोखण्यासाठी तयारी केली आहे. अशा घटना टाळण्यासाठी आता ट्रॅक मित्र रेल्वे रुळांवर लक्ष ठेवणार आहेत. रेल्वेमार्गात (Railway track) अडथळे उत्पन्न करणाऱ्या अनेक घटना गेल्या एक महिन्यात घडल्या आहेत. रेल्वे रुळांवर विद्युत खांब टाकणे, लाकडी दांडके, गॅस सिलिंडर अथवा दगड, सिमेंट ब्लॉक टाकण्याच्या घटना घडल्यानंतर रेल्वेने आता पटरी (ट्रॅक) मित्र (Track Friends) बनवण्याची मोहीम व ऑपरेशन संवाद सुरू केला आहे. लखनऊ मंडळमध्ये आतापर्यंत १७० ट्रॅक मित्रही बनवण्यात आले आहेत.

रुळालगत सीसीटीव्ही कॅमेरे
कडेकोट सुरक्षा करण्याच्या दृष्टीने रेल्वे रुळालगतची गावे, वसाहतींमध्ये राहणाऱ्या लोकांशी कर्मचारी व रेल्वे पोलिसांचे पथक, संवाद साधणार आहेत. रुळावर काही संशयास्पद हालाचाली अथवा संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तत्काळ रेल्वे अधिकारी, कंट्रोल रूम, स्टेशन, रेल्वे पोलिस अथवा जवळच्या रेल्वे क्रॅासिंगला माहिती देण्यात यावी, असे लोकांना सांगण्यात येत आहे. ज्या लोकांची घरे, दुकाने अथवा ऑफिस रेल्वे रुळालगत आहेत आणि त्यावर सीसीटीव्ही कॅमेरे लावले असल्यास या माध्यमातूनही निगराणी ठेवत ते रेल्वेची मदत करु शकतात. (Railway track)

‘ऑपरेशन संवाद’ सुरू
उत्तर रेल्वेच्या लखनऊ मंडळात ‘ऑपरेशन संवाद’ सुरू करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांतील घटनांनंतर रुळांवर निगराणी वाढवण्यात आली आहे. रेल्वेमार्ग परिसरात राहणाऱ्या लोकांना सजग राहून रेल्वेची मदत करण्याचे आवाहन करण्यात येत आहे, असे लखनऊ मंडळाचे विभागीय व्यवस्थापक एस.एम. शर्मा यांनी सांगितले. सुरक्षा व्यवस्थेलाही अत्याधुनिक केले जात आहे. इंजिनिअरिंग आणि आरपीएफ संयुक्त गस्त घालत आहे. (Railway track)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.