नवी दिल्ली ते जेएनपीटी (उरण) दरम्यान समर्पित जलदगती मालवाहू रेल्वे मार्गिकेचे काम शिळफाटा परिसरातील लोढा पलावा, निळजे परिसरात सुरू आहे. या कामासाठी लोढा पलावा ते निळजे दरम्यान भुयारी मार्गिका बांधण्यात येणार आहे. हे काम पूर्ण होईपर्यंत शु्क्रवारपासून (१८ ऑगस्ट) लोढा पलावा ते निळजे गावा दरम्यान असलेला रेल्वे बोगदा वाहतुकीसाठी काम पूर्ण होईपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. अशी माहिती वाहतूक पोलिसांनी दिले आहे.
हेही वाचा : chandrayan-3 : इस्रो ने पाठवला चंद्राचा पहिला व्हिडिओ)
कोळसेवाडी वाहतूक उपविभागाच्या हद्दीत हे काम होणार आहे. रेल्वे बोगद्यातून Railway Tunnel होणारी यापूर्वीची वाहतूक निळजे गाव रेल्वे फाटकातून सुरू ठेवण्यात येणार आहे. घेसरगाव, नारीवली, वडवली गावांकडून लोढा हेवनकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना निळजे रेल्वे बोगद्या जवळ प्रवेश बंद ठेवण्यात येणार आहे. ही वाहने रेल्वे बोगद्याजवळील रस्त्याने निळजे रेल्वे मार्गिकाला समांतर रस्त्याने पुढे जाऊन डावे वळण घेऊन निळजे रेल्वे फाटक मार्गे इच्छित स्थळी जातील.लोढा हेवनकडून घेसरगाव, नारीवली गाव, वडवली गावकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना पलावा भागातील कासारिओ संकुल येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे. ही सर्व वाहने काळू बाई चौकातून डावे वळण घेऊन निळजे रेल्वे फाटकमार्गे इच्छित स्थळी जातील, असे वाहतूक विभागाने जाहीर केले आहे. या भुयारी मार्गिकेचे काम पूर्ण होईपर्यत हा आदेश अंमलात राहणार आहे, असे उपायुक्त डाॅ. राठोड यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community