प्रवाशांच्या ‘या’ चुकीमुळे रेल्वे गाड्या धावत आहेत उशिराने…

143

रेल्वेने मेल/एक्स्प्रेस तसेच दैनंदिन प्रवासासाठी असणाऱ्या लोकल गाड्यांमध्ये अलार्म चेन पुलिंग (ACP) पर्याय उपलब्ध करून दिला आहे. अलिकडे प्रवासी उशिरा पोहोचल्यामुळे किंवा मधल्याच स्थानकांवर उतरायचे असेल इत्यादी अनावश्यक कारणांसाठी अलार्म चेन पुलिंग (ACP)चा वापर केला जात असल्याचे आढळले आहे. ट्रेनमधील अलार्म चेन पुलिंगचा अनावश्यक वापर केल्यास (ACP केवळ त्या विशिष्ट ट्रेनवरच नाही तर पाठीमागून येणाऱ्या गाड्यांवरही परिणाम होतो. मुंबई विभागासारख्या उपनगरीय प्रणालीमध्ये, यामुळे मेल/एक्स्प्रेस आणि उपनगरीय गाड्या उशिराने धावतात आणि त्याच्या वक्तशीरपणाला बाधा येते. तसेच इतर सर्व प्रवाशांचीही गैरसोय होते, असे रेल्वेने स्पष्ट केले आहे.

( हेही वाचा : Police Bharti : राज्यात १४,९५६ जागांसाठी पोलीस भरती; ‘या’ तारखेपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया)

अलार्म चेन पुलिंग करणे दंडनीय गुन्हा 

मध्य रेल्वे मुंबई विभाग अशा अनावश्यक अलार्म चेन पुलिंग (ACP) घटनांवर बारीक लक्ष ठेवून आहे. दिनांक 1 एप्रिल 2022 ते 26 ऑक्टोबर 2022 या वर्षात मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात 1 हजार 706 अनावश्यक अलार्म चेन पुलिंग (ACP) प्रकरणांची नोंद झाली आहे. यापैकी सुमारे 1,169 प्रवाशांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून 5.85 लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. यामुळेच अनावश्यक कारणांसाठी प्रवाशांनी अलार्म चेन पुलिंग वापरू नये असे आवाहन रेल्वेने केले आहे. तसेच यामुळे इतरांची सुद्धा गैरसोय होते.

अनावश्यक परिस्थितीत अलार्म चेन पुलिंग (ACP) करणे हा रेल्वे कायद्याच्या कलम 141 नुसार दंडनीय गुन्हा आहे. कोणतीही गैरसोय टाळण्यासाठी प्रवाशांनी आपली ट्रेन सुटण्याच्या किमान 30 मिनिटे आधी टर्मिनस/स्टेशनवर पोहोचण्याचा सल्ला रेल्वेने प्रवाशांना दिला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.