रेल्वेने फेरीवाल्यांच्या (Hawkers) विरोधात विशेष मोहीम हाती घेतली आहे. रेल्वे गाड्या (Railway trains) आणि रेल्वे परिसर येथील अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात (Hawkers) मध्य रेल्वेच्या संरक्षण दलाने विशेष मोहीम राबवली. (Hawkers Policy Railway) या वेळी गेल्या ८ महिन्यांत अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात २४ हजार ३३९ गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. या प्रकरणी २४ हजार ३३४ जणांना अटक करून त्यांच्याकडून मध्य रेल्वेने ३ कोटी ५ लाख रुपयांचा दंड वसूल केला.
(हेही वाचा – Ram Mandir : अयोध्येला जगातील सर्वात मोठे धार्मिक पर्यटन केंद्र बनवण्याचे उद्दिष्ट; महंत कमलनयन यांचे प्रतिपादन)
फेरीवाल्यांवर नियंत्रण नाहीच
एकट्या मुंबई विभागात ९,३९४ गुन्ह्यांची नोंद झाली असून, ९,३९३ जणांना अटक करण्यात आली आहे. एकूण १.०२ कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आलेला आहे.
रेल्वेस्थानक परिसरातील १५० मीटर क्षेत्र न्यायालयाने ‘नो फेरीवाला क्षेत्र’ (No hawker area) म्हणून घोषित केले आहे. तेथे सीमारेषा आखण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार रेल्वेनेही सीमारेषा आखली होती. तरीसुद्धा नियम तोडून अनधिकृत फेरीवाले यांचा व्यवसाय सुरूच आहे. याविषयी अनेकदा मध्य रेल्वेकडून कारवाई करण्यात आली आहे; मात्र तरीही फेरीवाल्यांवर नियंत्रण आलेले नाही.
(हेही वाचा – Congress : राहुल गांधींची ‘भारत न्याय यात्रा’ १४ जानेवारीपासून)
मध्य रेल्वेने अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम घेतली होती. रेल्वे सुरक्षा दलाच्या (Railway Security Force) फेरीवाला विरोधी पथकाने एप्रिल ते नोव्हेंबर २०२३ या कालावधीत अनधिकृत फेरीवाले आणि रेल्वेच्या आवारात अतिक्रमण करणाऱ्यांविरोधात यशस्वी मोहीम राबविली. (Hawkers Policy Railway)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community