पाण्याच्या बाटलीसाठी जास्तीचे पैसे आकारणाऱ्या कंत्राटदाराला रेल्वेने दंड आकारला आहे. रेल्वेने अंबाला डिविजनच्या एका कॅटरिंग कंत्राटदाराला १ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. पिण्याच्या पाण्याच्या बाटलीसाठी ५ रुपये अधिकचे वसून केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
( हेही वाचा : हवे ‘बेस्ट’ घर! हक्काच्या घरासाठी कर्मचाऱ्यांची मागणी)
रेल्वेकडून कंत्राटदाराला दंड
रेल्वे गेल्या काही वर्षापासून ग्राहकांना कुठेही अतिरिक्त पैसे द्यावे लागू नयेत म्हणून प्रयत्नशील आहे. याच पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे. IRCTC ने आपल्या सर्व वेंडर्स आणि कंत्राटदारांसाठी एक निश्चित प्राइज लिस्ट तयार केली आहे. यानुसार आता कोणत्याही कंत्राटदाराला निर्धारित रक्कमेपेक्षा अधिक किमतीने वस्तू विकता येणार नाही. एखाद्या कंत्राटदाराने असे केले आणि त्याची तक्रार रेल्वेला मिळताच संबंधित ठेकेदाराचा परवाना रद्द केला जाऊ शकतो किंवा आर्थिक दंड ठोठावण्यात येईल.
एका प्रवाशाने या संदर्भात व्हिडिओ ट्वीट केला आहे. यावर IRCTC ने कारवाई करत कंत्राटदाराला १ लाखांचा दंड ठोठावला आहे. चंदीगढवरून शाहजहॉंपूर येथे रेल्वेने प्रवास करताना या प्रवाशाने पाण्याची बाटली घेतली. यावेळी प्रवाशाला २० रुपये आकारण्यात आले. प्रत्यक्षात पाण्याची बाटलीची किंमत १५ रुपये इतकी होती. यानंतर प्रवाशाने रेल्वेकडे तक्रार केली असता आता IRCTC ने कंत्राटदार आणि वेंडर अशा दोघांवरही कारवाई केली आहे.
Join Our WhatsApp Community