तुम्ही ट्रेनने प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. आता ट्रेनमध्ये झोपण्याची वेळ बदलण्यात आली आहे. याआधी रात्री ९ ते सकाळी ६ या वेळेत प्रवासी एसी कोच किंवा स्लीपरमध्ये झोपू शकत होते. मात्र आता या बदललेल्या नियमांनुसार प्रवाशांना रात्री १० ते सकाळी ६ पर्यंतच झोपता येणार आहे.
सर्व प्रवाशांना रात्री चांगली झोप मिळावी यासाठी हा बदल करण्यात आला आहे. रात्री १० ते सकाळी ६ हा झोपण्यासाठी चांगला काळ मानला जातो. तुम्ही ट्रेनने प्रवास करत असाल तर या वेळा पाळणे अत्यंत गरजेचे आहे. खालच्या बर्थच्या प्रवाशांनी फार पूर्वीपासून तक्रार केली आहे की, मधल्या बर्थचे प्रवासी रात्री लवकर झोपतात आणि सकाळी उशिरा उठतात. त्यामुळे खालच्या बर्थवर जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होते.
(हेही वाचा – Heavy Rain : मध्य रेल्वेची सेवा फक्त डोंबिवलीपर्यंत तर मुंबई-पुणे दरम्यान १० रेल्वे रद्द)
या तक्रारी लक्षात घेऊन रेल्वेने झोपण्याच्या वेळेत बदल केला आहे. या नवीन नियमानुसार मिडल बर्थचे प्रवासी रात्री १० ते सकाळी ६ पर्यंतच झोपू शकतात. यानंतर त्यांना बर्थ रिकामा करावा लागेल. जर एखादा प्रवासी नियमांचे उल्लंघन करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला तुम्ही रोखू शकता. यामुळे प्रवाशाला सकाळी ६ नंतर मधला बर्थ खाली करून खालच्या सीटवर जावे लागेल. तसे न केल्यास संबंधित प्रवाशाविरुद्ध कारवाई होऊ शकते.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community