सण, उत्सव किंवा लागोपाठ सुट्ट्या आल्या की, मुंबईतील चाकरमानी वर्ग कोकणाची वाट धरतो. कोकणात जाण्यासाठी वर्षाचे बाराही महिने रेल्वे गाड्यांचे बुकिंग फूल असते. त्यामुळे अनेकवेळा कोकणावासीयांचे मोठ्या प्रमाणात हाल होतात याला पर्याय म्हणून तसेच प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वे लोकमान्य टिळक टर्मिनस ते सावंतवाडी रोडदरम्यान १८ अतिरिक्त विशेष गाड्या चालवणार आहे.
( हेही वाचा : आता रेल्वे प्रवासात जेवणाचे नो टेन्शन! २ एप्रिलपासून ही सुविधा सुरू )
कोकणात जाण्यासाठी विशेष गाड्या
- गाडी क्रमांक 01023 ही गाडी २५ मार्च ते २ एप्रिलपर्यंत लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई येथून रात्री २२.१५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी १०.०० वाजता सावंतवाडी रोडला पोहोचेल.
- गाडी क्रमांक 01024 ही विशेष गाडी २६ मार्च ते ३ एप्रिलपर्यंत सावंतवाडी रोड येथून ११.३५ वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे त्याच दिवशी रात्री २३.५५ वाजता पोहोचेल.
- गाडीचे थांबे : ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडावली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ.
- संरचना : दोन तृतीय वातानुकूलित, १० शयनयान, गार्ड ब्रेक व्हॅनसह ६ सामान्य द्वितीय श्रेणी डबे
या दोन्ही गाड्यांचे तिकिट बुकिंग २४ मार्चपासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल. तपशीलवार वेळा आणि थांब्यासाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा रेल्वेचे NTES अॅप डाउनलोड करा. असे आवाहन कोकण रेल्वेने केले आहे. तसेच प्रवाशांनी स्वत:च्या सुरक्षेसाठी कोविड नियमांचे पालन करावे असेही रेल्वेने सांगितले आहे.
Join Our WhatsApp Community