इंधनाचे भाव आधीच गगनाला भिडले आहेत. नुकतेच सीएनजी आणि पीएनजी गॅसच्या किमतीतही वाढ करण्यात आली. त्यातच आता रेल्वे प्रवासही महागणार आहे. रेल्वे स्थानकांच्या विकासकामांसाठी लागणारा निधी आता तिकिटांवर अतिरिक्त पैसे आकारुन उभारला जाणार आहे. या आकारण्यात आलेल्या पैशांना ‘स्टेशन डेव्हलपमेंट फी’ असे नाव देण्यात आले आहे.
रेल्वे बोर्डाने दिली माहिती
वेगवेगळ्या श्रेणीमध्ये प्रवास करणा-या प्रवाशांना प्रत्येक तिकिटामागे १० ते ५० रुपये अतिरिक्त मोजावे लागणार आहेत. हे शुल्क आकारण्यासंदर्भात रेल्वेने वेगवेगळे नियम केले आहेत. यासंदर्भातील माहिती अधिकृत पत्रक जारी करुन रेल्वे बोर्डाने दिली आहे. वेगवेगळया प्रमाणात हे स्टेशन डेव्हलपमेंट शुल्क आकारण्यात येणार आहे.
( हेही वाचा :गोल्डन बॉय नीरज चोप्राचा ‘भारतीय डाक’ तर्फे ‘अनोखा’ सन्मान, वाचा सविस्तर )
कोणत्या श्रेणीसाठी किती पैसे आकारले जाणार जाणून घेऊया:
उपनगरीय रेल्वे
- उपनगरीय (एकावेळेच्या प्रवासाचं तिकीट) – ० रुपये
- उपनगरीय रेल्वे (पास) – ० रुपये
आरक्षण न केलेले प्रवासी (उपनगरीय रेल्वे वगळता)
- साधारण ट्रेन (सेकेण्ड क्लास) – १० रुपये
- मेल/एक्सप्रेस ट्रेन (सेकेण्ड क्लास) – १० रुपये
- फर्स्ट क्लास – १० रुपये
- एसी एमईएमयू/डीईएमयू – १० रुपये
आरक्षण केलेले मात्र नॉन एसी (उपनगरीय रेल्वे वगळून)
- सेकेण्ड क्लास – २५ रुपये
- स्लीपर क्लास साधारण – २५ रुपये
- स्लीपर क्लास (मेल किंवा एक्सप्रेस) – २५ रुपये
- फर्स्ट क्लास – २५ रुपये
आरक्षण केलेले एसी क्लास
- एसी चेअर क्लास ५० रुपये
- एसी थ्री टीयर/ थ्री एसी इकनॉमी क्लास ५० रुपये
- एसी टू टीयर ५० रुपये
- एसी फर्स्ट क्लास/ईसी/ईए/एसी विस्टाडोम ५० रुपये