१२ सप्टेंबरपासून ८० नव्या विशेष ट्रेन

96

राज्यासह देशामध्ये सध्या कोरोनाच्या संकटामुळे मोठ्या प्रमाणामध्ये विशेष ट्रेनची संख्या कमी करण्यात आली होती. मात्र आता अनलॉक ४ मध्ये विशेष ट्रेनची संख्या वाढण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने पाऊल उचलले असून,१२ सप्टेंबरपासून ८० नव्या विशेष ट्रेन सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आज रेल्वे बोर्डाचे चेअरमन विनोद कुमार यांनी एक महत्वपूर्ण निर्णयाची माहिती दिली. १२ सप्टेंबरपासून ८० नव्या विशेष रेल्वे (४० पेअर्स) धावणार असून, यासाठी १० सप्टेंबरपासून तिकीट आरक्षणास सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

म्हणून विशेष ट्रेनमध्ये वाढ

आगामी काळ प्रमुख सणासुदीचा काळ असल्याने रेल्वेकडून विशेष ट्रेनची संख्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे दिसत आहे. दसरा, दिवाळी, छठ पुजा सारखे सण पुढील काळात असल्याने या दरम्यान रेल्वेची संख्या वाढवण्याची मागणी होत असते. शिवाय, रेल्वेंमध्ये गर्दी देखील वाढत असते. ही बाब लक्षात घेता रेल्वेकडून ४० पेअर्स नव्या विशेष रेल्वे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या रेल्वेंमध्ये मोठी वेटिंग लिस्ट आहे. दसरा, दिवाळी व छठ पुजेसाठी रेल्वेची मोठ्याप्रमाणावर मागणी आहे. ही मागणी पूर्ण करण्यासाठी रेल्वे विभागाकडून या विशेष रेल्वे चालवल्या जाणार आहेत. मुंबई, कोलकाता, लखनऊ, पाटणा, दिल्ली या मार्गांवर विेशेष रेल्वे धावणार आहेत. सध्या महाष्ट्र व पश्चिम बंगाल सरकारशी याबाबत चर्चा सुरू आहे. सध्या विशेष रेल्वेच्या नावाने २३० एक्स्प्रेस ट्रेन्स चालवल्या जात आहेत. ज्यामध्ये ३० राजधानी एक्स्प्रेसचा देखील समावेश आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.