रेल्वे रुळांवर आता दिसणार नाहीत दगड, भारतीय रेल्वे नवीन ट्रॅक बसवण्याच्या तयारीत

वर्षानुवर्ष भारतीय रेल्वे मार्गांवरील ट्रॅकवर आपल्याला खडी पहायला मिळतात. या खडीमुळेच रेल्वे गाडी रुळावर सुरक्षितपणे धावू शकते. पण आता या खडींच्या ऐवजी एक वेगळा रेल्वे ट्रॅक बनवण्यासाठी भारतीय रेल्वेकडून प्रयत्न करण्यात येत आहेत.

कसे असतील नवे ट्रॅक?

हे जुने ट्रॅक बदलून त्याजागी स्टोनलेस किंवा स्लॅब ट्रॅक बसवण्यासाठी भारतीय रेल्वेकडून विचार करण्यात येत आहे. द इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार, सुरुवातीला देशातील काही महत्वाच्या स्थानकांवर हे ट्रॅक बसवण्यात येणार आहेत.

(हेही वाचाः रेल्वे स्टेशनवरील पिचका-या बंद करण्यासाठी रेल्वे प्रशासनाची भन्नाट युक्ती)

डागडुजीचा वेग कमी होणार

रेल्वे रुळावरुन गाडी जात असताना मोठे अपघात टाळण्यासाठी रुळांची देखभाल करणे गरजेचे असते. रेल्वे रुळ जागच्या जागी भक्कमपणे राहण्यासाठी त्यांच्या भोवती करड्या रंगाची खडी टाकण्यात येते. पण ब-याचदा ही खडी खचतात, त्यामुळे वेळच्या वेळी रेल्वे रुळांची डागडुजी करणं देखील महत्वाचं असतं. त्यामुळे यासाठी लागणार वेळ कमी करण्यासाठी रेल्वेकडून नवीन ट्रॅक आणण्याचा विचार होत आहे.

(हेही वाचाः UTS App मध्ये रेल्वे करणार ‘हा’ बदल! तिकीट, पास काढताना प्रवाशांना होणार मोठा फायदा)

या नव्या स्लॅब ट्रॅकमुळे रेल्वे रुळांवर साचणारा कचरा आणि घाण लगेच स्वच्छ होईल आणि त्यामुळे रेल्वे ट्रॅक अस्वच्छ राहणार नाहीत, अशी माहिती रेल्वेच्या अधिका-यांकडून मिळत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here