जुलै महिन्यात राज्यातील बहुतांश भागात पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असतानाच पावसाचा जोर येत्या दिवसांत काहीसा कमी होणार असल्याची चिन्हे वातावरणात दिसून येत आहेत. मुसळधार पावसाचा जोर शुक्रवार, २८ जुलैपासून संपत असून आता येत्या दिवसांत राज्यात पावसासाठी ऑरेंज आणि येलो अलर्ट राहील.
राज्यातील जालना, सातारा आणि सांगली जिल्ह्यात फारसा पाऊस झाला नाही. इतर भागात जुलै महिन्याच्या सरासरीपेक्षाही जास्त पाऊस झाला आहे. राज्यात घाट माथ्याचा परिसर, यवतमाळ, हिंगोली येथे पूर आला. चंद्रपूर जिल्ह्यातील पावसाने कित्येक वर्षांचा जुलै महिन्यातील विक्रम मोडला. दक्षिण कोकणात पावसाच्या पाण्याने भातशेतीचे नुकसान झाले. पावसाचे वितरण मात्र सम प्रमाणात न झाल्यामुळे खरीप हंगामाची स्थिती राज्यात विशेष समाधानकारक भावत नाही, असे हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले.
(हेही वाचा – माजी शिक्षण समिती सभापती मंगेश सातमकर यांचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश)
५ ऑगस्ट पर्यंत मुंबईसह संपूर्ण कोकण व सह्याद्रीचा घाटमाथा वगळता विदर्भ, मराठवाडा, खान्देश सह उर्वरित महाराष्ट्रात पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता जाणवते. तेथे केवळ मध्यम पावसाचीच शक्यता जाणवते, असेही खुळे म्हणाले. मात्र मुंबईसह संपूर्ण कोकण व सह्याद्रीचा घाटमाथा परिसरात जोरदार पावसाची शक्यता अजुन कायम जाणवते, असा अंदाजही त्यांनी वर्तवला.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community