उत्तराखंडमध्ये (Uttarakhand) मुसळधार पाऊस (Rain Alert) आणि भूस्खलनामुळे राष्ट्रीय महामार्ग 107 आणि 58 रुद्रप्रयाग ते डोलिया देवी (FATA) येथील गौरीकुंड आणि ऋषिकेश ते बद्रीनाथपर्यंत ब्लॉक करण्यात आला आहे. रस्त्यावर अनेक ठिकाणी डेब्रिज साचले असून त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पावसामुळे शनिवारी (६ जुलै) अमरनाथ यात्रा थांबवण्यात आली आहे. पहलगाम आणि बालटाल या दोन्ही मार्गांनी पवित्र गुहेकडे जाणारे रस्ते बंद करण्यात आले आहेत. प्रवाशांना त्यांच्या बेस कॅम्पवर परत पाठवले जात आहे. हवामान सुधारल्यानंतर प्रवाशांना पुढे जाण्याची परवानगी दिली जाईल.
पुरामुळे ७७ जनावरांचा मृत्यू
हवामान खात्याने उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. 5 ते 7 जुलै दरम्यान राज्यात विविध ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. या कालावधीत, पाऊस 64.5-115.5 मिमी ते 115.5-204.4 मिमी पर्यंत असू शकतो. असा हवामान खात्याचा अंदाज आहे. आसाममध्ये पाऊस, पूर, वादळ आणि भूस्खलनामुळे जीव गमावलेल्या लोकांची संख्या 62 वर पोहोचली आहे. ३ बेपत्ता आहेत. 29 जिल्ह्यांतील 22 लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे. नद्या धोक्याच्या चिन्हावरुन वाहत आहेत. काझीरंगा नॅशनल पार्कमध्ये पुरामुळे ७७ जनावरांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 94 जनावरांची सुटका करण्यात आली आहे. (Rain Alert)
देशातील १५ राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता
IMD ने उत्तराखंड, पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार, सिक्कीम, पश्चिम बंगाल, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मेघालय, आसाम, महाराष्ट्र, गोवा, गुजरात, ओडिशा, कर्नाटक, हिमाचल प्रदेश या २८ राज्यांसाठी शनिवार (६ जुलै) अलर्ट जारी केला आहे. हरियाणा, दिल्ली, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, झारखंड, राजस्थान, केरळ, नागालँड, त्रिपुरा, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. देशातील १५ राज्यांमध्ये आज मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. (Rain Alert)
जुना बोगदा भूस्खलनामुळे बंद
शुक्रवारी उत्तराखंडमधील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे भूस्खलन होऊन ८८ रस्त्यांवरील वाहतूक विस्कळीत झाली. रुद्रप्रयागमधील जुना बोगदा भूस्खलनामुळे बंद झाला होता. डेहराडूनमध्ये दिवसभर अधूनमधून पाऊस पडत होता. याठिकाणीही अनेक रस्ते रोखण्यात आले. पावसामुळे पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून 5 वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. हरिद्वारमध्ये एका मुलालाही आपला जीव गमवावा लागला आहे. (Rain Alert)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community