गोविंदा रे गोपाळा म्हणत हंडी फोडण्यासाठी सज्ज झालेल्या गोविंदा पथकाकडून दरवर्षी खिडक्यातील ताई तुम्ही वाकू नका…, दोन पैसे देतो तुला भिजवून टाका म्हणणाऱ्या गोविंदाची मागणी वरुणराजाने पूर्ण केली. पावसाने सकाळपासून हजेरी लावत मुसळधार बरसात केल्याने हंडी फोडण्यासाठी थर रचणारे गोविंदा भिजून गेले. दिवसभरच पावसाची संततधार सुरु राहिल्याने वातावरणातील थंडाव्यामुळे गोविंदांना हुडहुडी भरली आणि त्यामुळे थर रचताना अनेक अडचणींचा सामना त्यांना करावा लागला करावा लागला.
मुंबईत गोपाळ काल्यासाठी हंडी फोडण्याचा मागील अनेक दिवसांपासून सराव करणारे गोविंदा पथके गुरुवारी मुंबईतील अनेक वस्त्यांमधून रस्त्यावर आली. प्रत्येक रस्त्यावर आणि गल्ल्यांमध्ये विविध रंगी टी शर्ट घालून ट्रक आणि खासगी बसेसमधून फिरत ही पथके हंडीचा शोध घेत होते. परंतु यंदा मात्र, पावसाने सकाळपासूनच हजेरी लावल्याने आणि वातावरणातील दमट व थंडपणामुळे सुरुवातीपासूनच अनेक गोविंदा पथकातील गोविंदा आणि त्यांना साथ देणारे गोविंदा गारठल्याचे पहायला मिळत होते.
(हेही वाचा – Mumbai-Goa Highway : सरकारचे आश्वासन फोल; गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे भरण्यात ठेकेदार अपयशी)
पावसात भिजल्यामुळे अनेक गोविंदा थरथरत चालत होते. त्यामुळे थंड वातावरणामुळे हुडहुडी भरलेल्या अनेक गोविंदांचा हंडी फोडण्यासाठी थरही लावताना अनेक अडचणी येत होते. तसेच हंडी फोडणाऱ्या पथकातील गारठलेल्या गोविंदाला बाजुला करत दुसऱ्या गोविंदाला थरावरच चढवण्याची वेळ मास्तरांवर येत होती. एरव्ही पथकाच्या गाडीमध्ये जेवण आणि नाश्त्याची सुविधा असते. परंतु यंदा मात्र गारठलेल्या गोविंदाला चार्ज करण्यासाठी चहाची व्यवस्था प्रत्येक पथकाच्या गाडीत करण्यात आली होती. त्यामुळे गरमागरमा चहा पित गोविंदा पुन्हा पावसात भिजत हंडी फोडायला सज्ज होत होते.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community