Rain : मुंबई मध्ये पावसाची जोरदार बॅटींग ,अंधेरी सबवे वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद

मुसळधार पाऊस असल्यामुळे मुंबईच्या सखल भागामध्ये पाणी भरायला सुरुवात झाली आहे.

116
Rain : मुंबई मध्ये पावसाची जोरदार बॅटींग ,अंधेरी सबवे वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद
Rain : मुंबई मध्ये पावसाची जोरदार बॅटींग ,अंधेरी सबवे वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद

पश्चिम उपनगरात मागील एक तासापासून मुसळधार पाऊस (Rain) सुरू आहे. मुंबईसाठी शुक्रवारी (८ सप्टेंबर) हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. १०० मिमीहून अधिक पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात देखील काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पावसाला पुन्हा सुरुवात झाल्यानं बळीराजाच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे.अंधेरी सबवे वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद झाला आहे.

पश्चिम उपनगरात अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव,मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसर, विलेपार्ले,वांद्रे, सांताक्रुज परिसरात सध्या पावसाची चांगली बॅटिंग सुरू आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिला तर अर्ध्या ते एक तासांत सखल भागामध्ये पाणी भरायला सुरुवात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, ठाण्याकडून सीएसटीकडे जाणाऱ्या लोकल          १० ते १५ मिनिटं उशिराने धावत आहेत.
मुसळधार पाऊस असल्यामुळे मुंबईच्या सखल भागामध्ये पाणी भरायला सुरुवात झाली आहे. मुंबईचा अंधेरी सबवे (Andheri Subway) हा सखल भाग असल्यामुळं सबवे खाली पाणी भरले आहे. त्यामुळं हा मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. अंधेरी सबवे खाली तीन ते चार फूट पाणी भरला आहे.

(हेही वाचा : G20 च्या बैठकीआधी जागतिक बँकेने उधळली भारतावर स्तुतीसुमने)

सध्या वाहतुकीसाठी अंधेरी सबवे पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. अंधेरी सबवे बंद झाल्यामुळे अंधेरी पूर्व आणि पश्चिम परिसरात मोठे वाहतूक कोंडी निर्माण व्हायला सुरुवात झाली आहे. मराठवाड्यातही चांगला पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने दर्शवली आहे.

मुंबईतील धरण क्षेत्रात चांगला पाऊस
पुढील तीन दिवस राज्यात पावासाची शक्यता वर्तवली आहे. मागील २४ तासात मुंबईतील धरण क्षेत्रात चांगला पाऊस पडला आहे. तानसा १०० भरल्यानंतर धरणाचे दरवाजे उघडले आहेत. तसेच मध्य वैतरणातून देखील विसर्ग सुरु करण्यात आला आहे. मोडकसागर देखील आज किंवा उद्यामध्ये १०० टक्के भरण्याची शक्यता आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.