Rain Alert : मुंबई-ठाण्यात रविवारपासून ३ दिवस मुसळधार पाऊस, राज्यातील ‘या’ जिल्ह्यांनाही काळजी घेण्याचे आवाहन; वाचा हवामान खात्याचा इशारा

मुंबई-ठाण्यात रविवारपासून पावसाला सुरुवात होईल.

326
Rain Alert : मुंबई-ठाण्यात रविवारपासून ३ दिवस मुसळधार पाऊस, राज्यातील 'या' जिल्ह्यांनाही काळजी घेण्याचे आवाहन; वाचा हवामान खात्याचा इशारा
Rain Alert : मुंबई-ठाण्यात रविवारपासून ३ दिवस मुसळधार पाऊस, राज्यातील 'या' जिल्ह्यांनाही काळजी घेण्याचे आवाहन; वाचा हवामान खात्याचा इशारा

सर्वांना प्रतीक्षा लागून राहिलेला मान्सून कोकणात डेरेदाखल झाल्यानंतर चांगलाच स्थिरावला असून राज्यभरात वेगाने पसरत आहे, तर रविवारपासून मंगळवारपर्यंत मुंबई-ठाणे परिसरात ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस पडणार असल्याने हवामान खात्याकडून खबरदारीसाठी ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे, तर सिंधुदुर्गला काळजी घेण्याचा ‘ऑरेंज अलर्ट’ हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी ३ दिवस आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे, असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. (Rain Alert)

मुंबई-ठाण्यात रविवारपासून पावसाला सुरुवात होईल. १० आणि ११ जून रोजी मुंबई-ठाणे परिसरात मेघ गर्जनेसह पावसाच्या जोरदार सरी कोसळतील, मात्र हा मान्सूनचा पाऊस नसून मान्सून पूर्व पाऊस आहे, असे आयएमडी, मुंबईच्या सुषमा नायर यांनी सांगितले. (Rain Alert)

(हेही वाचा –State Transport Corporation: एसटीचे तिकीट काढण्यासाठी सुट्या पैशांची चिंता मिटली, कारण? जाणून घ्या )

राज्यात अनेक जिल्ह्यांना इशारा
ठाणे, मुंबई, पालघर, रायगड या भागात पावसाची हजेरी लागण्याचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. याशिवाय, जळगाव, धुळे, कोल्हापूर, नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशीव या जिल्ह्यांत पुढील ४८ तासांसाठी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुणे आणि नगर या भागात काही ठिकाणी रिमझिम पाऊस पाहायला मिळेल, असे हवामान खात्याकडून कळविण्यात आले आहे.

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.