राज्यात आत्ता कुठे थंडीची चाहूल लागत असताना काही भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे . हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यात पाऊस सुरु झाला आहे. मुंबईतील अंधेरी, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड परिसरात मध्यरात्री पासून रिमझिम पाऊस सुरू आहे. (Rain Update)
मुंबई आणि उपनगरात मध्यरात्रीपासून पाऊस सुरु आहे. वसई, विरार, नालासोपारा परिसरात मध्यरात्रीपासून रिमझिम पाऊस सुरू आहे. मेघागर्जनेसह पावसाने हजेरी लावली आहे. या भागांत पाऊस सुरु होताच वीज पुरवठा खंडित झाला आहे. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. यामुळे उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. Rain Update
तसेच सिंधुदुर्गातही सलग दुसऱ्यादिवशी पावसानं हजेरी लावली. कुडाळ, कणकवली, वेंगुर्ले, सावंतवाडी, दोडामार्ग, वैभववाडी तालुक्यात पावसाच्या सरी बरसल्या. या अवकाळी पावसामुळे आंबा आणि काजू पिकांवरही परिणाम होण्याची चिन्ह आहेत. तर तिकडे साताऱ्यातील महाबळेश्वरमध्येही काल अवकाळी पावसानं हजेरी लावली. जवळपास अर्धा तास पडलेल्या पावसामुळे परिसरात गारव्यात आणखी वाढ झाली होती. तसंच पुढच्या तीन ते चार तासांत मुंबई, ठाणे, रायगड आणि पुण्यात सोसायट्याच्या वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
(हेही वाचा : Mumbai Attack : भारताची सागरी सुरक्षा – पेला अर्ध्याहून अधिक भरलेला; पण अजूनही पुष्कळ काम बाकी)
राज्यात अनेक जिल्ह्यांत यलो अलर्ट
पुणे हवामान विभागाने रविवारी मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यातील अनेक भागांत पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. त्यानुसार पावसाला सुरुवात झाली आहे. अजून दोन दिवस राज्यातील काही भागांत पावसाचा यलो अलर्ट असणार आहे. हिवाळी मोसमी वारे व चक्रीय सक्रीय झाल्यामुळे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. यामुळे महाराष्ट्रात पाऊस पडत आहे. मोसमी वारे महाराष्ट्रातील पश्चिम किनारपट्टीकडे आगेकूच करणार आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात रविवारी सकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे.
हेही पहा –