मुंबईत सोमवारी, १३ मे रोजी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने (Rain in Mumbai) धुमाकूळ घातला. त्यामध्ये वडाळा आणि घाटकोपर येथे मोठे होर्डिंग कोसळेल. घाटकोपर येथील होर्डिंगच्या खाली तब्बल १०० जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. त्यातील २५ जखमींना राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
अवकाळी पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प झाल्याने प्रवाशांची रेल्वेरूळावरून पायपीट
.#mumbairains #winds #hindusthanpostmarathi #maharashtra #centralrailways #localtrains pic.twitter.com/ULRGLkYwln— Hindusthan Post Marathi (@HindusthanPostM) May 13, 2024
वडाळ्यात होर्डिंग कोसळले
मुंबईत आधी वडाळ्यात श्री जी टॉवरजवळ होर्डिंग कोसळल्याची घटना घडली. या दुर्घटेनत काही नागरीक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. घटनास्थळी प्रशासनाचे बचाव पथक आणि पोलीस दाखल झाल्याची देखील माहिती मिळत आहे. त्यावेळी सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊसही पडला (Rain in Mumbai). याचा परिणाम वाहतुकीवरही झाला आहे. अनेक ठिकाणी झाडेदेखील उन्मळून पडली आहेत. तसेच वडाळ्यात होर्डिंग कोसळल्याच्या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. संबंधित परिसरात धुळीचे मोठे साम्राज्य बघायला मिळाले.
ट्रॅफिक अलर्ट! ठाणे- बेलापूर रोडवर वादळामुळे रस्त्यावर पडले इलेक्ट्रिक पोल
.#thane #belapur #winds #rains #heavyrainfall #hindusthanpostmarathi #marathinews #maharashtra pic.twitter.com/Il6u2Eq3vc— Hindusthan Post Marathi (@HindusthanPostM) May 13, 2024
(हेही वाचा Rain in Mumbai : मुंबईत पावसाचा पॉवर प्ले; विमानतळाचा रन-वे बंद, मेट्रो ठप्प)
घाटकोपरमध्ये पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळले
वडाळ्यातील होर्डिंग कोसळल्याची घटना ताजी असतानाच घाटकोपरमध्ये भलेमोठे होर्डिंग कोसळल्याची घटना घडली. घाटकोपरमधील रमाबाई परिसरातही मोठे होर्डिंग कोसळले आहे. पेट्रोल पंपावर हे होर्डिंग कोसळले आहे. घाटकोपरमध्ये सोसायट्याच्या वाऱ्यासह धुळीचे वादळ आले. या वादळामुळे भलंमोठं होर्डिंग पेट्रोल पंपावर कोसळले. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. संबंधित पेट्रोल पंपाच्या खाली 100 पेक्षा जास्त नागरिक आणि वाहने अडकल्याची भीती वर्तवली जात आहे. घाटकोपरमध्ये होर्डिंग पडल्याची घटना कॅमेऱ्यातही कैद झाली आहे. अतिशय भयानक अशी ही घटना आहे. या घटनेनंतर पोलीस, अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले आहेत. बचाव पथकाने आतापर्यंत अनेक नागरिकांना बाहेर काढले आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी पाठवले आहे. बचावाचे काम अद्यापही सुरु असल्याची माहिती मिळत आहे. (Rain in Mumbai)
घाटकोपर येथे वादळी वाऱ्यामुळे पडले अवाढव्य होर्डिंग
.#Mumbairains #ghatkopur #marathinews #breakingnews #trending #reels #hindusthanpostmarathi pic.twitter.com/J5lKd72zQb— Hindusthan Post Marathi (@HindusthanPostM) May 13, 2024
जोगेश्वरीत रिक्षावर झाड कोसळून चालक गंभीर जखमी
दरम्यान, पावसाने (Rain in Mumbai) जोगेश्वरी पूर्वेकडील मेघवाडी नाक्या जवळील शिवसेना शाखा क्र ७७ जवळील उंच नारळाचे झाड रस्त्यावरील ऑटो रिक्षावर कोसळले. त्यात रिक्षा चालक गंभीर जखमी झाले. रिक्षा चालकाला जोगेश्वरीमधील हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल केले.
बाप रे गारा पडल्या ! कर्जत-खालापूरमध्ये गारांचा पाऊस जोरदार वाऱ्यासह गारांचा पाऊस !
अनेक ठिकाणी वादळी वारे सुरु मावळ लोकसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात पावसाला सुरुवात अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ.
.#Maharashtrarains #raigad #mumbairains #winds #marathinews pic.twitter.com/NBaKEmVQbA— Hindusthan Post Marathi (@HindusthanPostM) May 13, 2024
Join Our WhatsApp Community