रात्रीस पावसाचा खेळ चाले…

सलग दोन दिवस पावसाच्या हलक्या सरींनी हजेरी लावल्यानंतर एका दिवसाच्या ब्रेकवर गेलेल्या वरुणराजाने रविवारी रात्री आठनंतर मुंबईतील बहुतांश भागांत हजेरी लावली. रात्री विजांच्या कडकडाटांसह सरींचाही जोर वाढल्यानंतर रविवारचा मुंबईकरांचा रात्रीचा वीकेण्ड चांगलाच गाजला.

वीकेण्डचा मूड घालवला

सोमवारपर्यंत सायंकाळी किंवा रात्री विजांच्या कडकडाटांसह पावसाच्या सरी कोसळतील, असा पूर्वानुमान मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने दिला होता. गुरुवारपासून मुंबईत सायंकाळी काही मिनिटांसाठी पावसाच्या हलक्या सरी दिसून येत होत्या. मात्र शनिवारी गैरहजर राहिलेल्या वरुणराजामुळे रविवारी पावसाच्या आगमनाबाबत कित्येकांनी साशंकता व्यक्त केली. त्यात वीकेण्ड फिव्हरमध्ये असलेल्या कित्येकांचा रात्रीच्या पावसामुळे विचका झाला. छत्री नसल्याने कित्येकांची तारांबळ उडाली.

(हेही वाचा टास्क फोर्स म्हणतेय शाळा बंदच ठेवा, शिक्षण विभागाचा विरोध!)

या भागात पडला पाऊस 

घाटकोपर, कांदिवली, मालाड, भायखळा, माझगाव, दहिसर, अंधेरी, मरोळ, कुर्ला आदी भागांसह नवी मुंबई, खारघर, डोंबिवली आदी मुंबई नजीकच्या भागांतही पावसाचा मारा सुरु होता. रात्री बराच वेळ पावसाची हजेरी सुरुच राहिली होती.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here