राज्यात काही भागात पावसाचा जोर दिसून येत आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मुंबई आणि नवी मुंबई परिसरात पावसाने काहीशी विश्रांती घेतली होती. मात्र, शुक्रवारी (१४ जुलै) सकाळपासूनच मुंबईत पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली आहे.
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार विदर्भासह कोकणात पावसाने हजेरी लावली आहे. त्याचबरोबर राज्याच्या उर्वरित भागातही आता पुन्हा पावसाचा जोर वाढताना दिसत आहे. काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाचा आज चांगलाच जोर वाढला आहे. तर अंधेरी सबवे पाणी साचल्यामुळे बंद ठेवण्यात आला आहे, सबवेखाली दीड ते दोन फूट पाणी साचले आहे. तर मुंबईतील सखल भागात पाणी साचायला सुरूवात झाली आहे.
(हेही वाचा – AI मुळे बंगळुरुच्या कंपनीने आपल्या कर्मचार्यांना काढलं? काय आहे खरं कारण?)
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात पुढचे चार ते पाच दिवस पावसाची दमदार हजेरी असणार आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र विदर्भातील काही ठिकाणी मुसळधार, तर मराठवाडा आणि इतर काही भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community