गोदावरीला (Godavari) यंदाच्या वर्षातील दुसऱ्यांदा पूर (Rain Update) आला आहे. जिल्ह्यातील 10 धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नाशिक शहरासह जिल्ह्याभरात गेल्या तीन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात देखील पावसाचा जोर कायम असल्याने धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
गंगापूर धरणातून (Gangapur Dam) शनिवारी सकाळपासून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला. टप्पाटप्प्याने विसर्गात वाढ करून सायंकाळी 8 हजार 428 क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात आला असून तो आताही कायम आहे. यामुळे गोदा काठावरील अनेक मंदिरे पाण्याखाली गेली असून दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी लागले आहे. नदी काठावरील छोटे पूल पाण्याखाली गेले आहेत. (Rain Update)
किती विसर्ग सुरू?
सध्या नाशिक, पेठ, सुरगाणा, इगतपुरी, त्र्यंबकेश्वरसह अन्य तालुक्यातही पाऊस सुरू आहे. जिल्ह्यातील 10 धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. गंगापूर धरणातून 8 हजार 428 क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरु आहे, दारणातून 14 हजार 8132 क्यूसेक, भावलीतून 701 क्यूसेक भाम धरणातून 2 हजार 990, गौतमी गोदावरीतून 1 हजार 536, वालदेवीतून 107, कडवातून 5 हजार 626, आळंदीतून 80 क्युसेक, भोजापूर धरणांतून 1 हजार 524 क्यूसेक वेगाने विसर्ग सुरू आहे तर नांदूरमध्यमेश्वरमधून 39 हजार 2 क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग केला जात आहे. (Rain Update)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community