Rain update : मुंबईमध्ये सलग २ दिवस मुसळधार पाऊस, लोकलची सद्यस्थिती-हवामानाचा अंदाज काय? जाणून घ्या…

मुख्य मार्गावरील जलद आणि धीम्या दोन्ही लोकल वेळापत्रकापेक्षा २ ते ३ मिनिटे उशिरा धावत आहेत.

164
Rain update : मुंबईमध्ये सलग २ दिवस मुसळधार पाऊस, लोकलची सद्यस्थिती-हवामानाचा अंदाज काय? जाणून घ्या...
Rain update : मुंबईमध्ये सलग २ दिवस मुसळधार पाऊस, लोकलची सद्यस्थिती-हवामानाचा अंदाज काय? जाणून घ्या...

मुंबईमध्ये सलग दोन दिवस मुसळधार पाऊस झाल्याचं पाहायला मिळालं. या जोरदार पावसामुळे शहराची लाईफलाईन असलेली लोकलसेवा विस्कळीत झाल्याचं समोर आलं होतं. दादर स्थानकात लांब पल्ल्याच्या गाड्या थांबून होत्या, तर सीएसटी स्थानकात फलाट रिकामे नसल्याने एक्स्प्रेस गाड्या रुळावर रखडल्या होत्या; पण मंगळवार, (९ जुलै) शहरात लोकल मंद गतीने आणि उशिराने धावत आहेत.

लोकलची सद्यस्थिती काय आहे?
शहरात रात्रीपासून पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याचं पाहायलं (Mumbai Local) मिळालं. पाणी ओसरल्यानंतर हार्बर मार्गावरील ट्रॅक पहाटे साडेचार वाजता कार्यान्वित करण्यात आला. मुख्य मार्गावरील जलद आणि धीम्या दोन्ही लोकल वेळापत्रकापेक्षा २ ते ३ मिनिटे उशिरा धावत आहेत. हार्बर मार्गावरील लोकल जवळपास वेळेवर धावत आहेत. अचानक सोमवारी, (८ जुलै) पावसामुळे काही ठिकाणी लोकल रद्द तर काही ठिकाणी उशीरा धावत असल्यामुळे नागरिकांची मोठी धांदल उडाली होती. पश्चिम रेल्वेची उपनगरीय सेवा सुरळीत सुरू झाली आहे.

  • – पाणी ओसरल्यानंतर हार्बर लाइनवरील ट्रॅक पहाटे साडेचार वाजल्यापासून कार्यान्वयित करण्यात आले आहेत.
    – मध्य मार्गावरील जलद आणि धिम्या गतीच्या गाड्या वेळापत्रकापेक्षा २ ते ३ मिनिटं उशिराने धावत आहेत.
    – पश्चिम मार्गावरील लोकल सेवा सुरळीत सुरू आहे.
    – हार्बर मार्गावरची वाहतूक २५-३० मिनिटे उशिराने धावत आहे.
    – एलबीएस मार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू आहे.

(हेही वाचा – काँग्रेसला Supreme Court मध्ये झटका; संविधानातून धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी शब्द निघणार?  )

मुंबईत आजही मुसळधार पावसाची शक्यता
सोमवारपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने मध्यरात्रीपासून थोडी विश्रांती घेतली. त्यामुळे तिन्ही रेल्वे मार्ग आणि रस्ते वाहतूक मार्ग देखील सुरळीत झाले आहेत. भारतीय हवामान खात्याने मुंबईत मंगळवारीही (९ जुलै) मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली (Mumbai Local Train Latest Update) आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्या हेतूने आज शाळा-महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे तसेच यंत्रणेतील सज्ज राहण्याच्या सूचनादेखील प्रशासनाने दिल्या आहेत.

आवश्यकता असेल, तरच घराबाहेर पडा
उपनगरातील सखल भागात साचलेले पाणी ओसरले (Mumbai Rain) आहेत. त्यामुळे रस्तेदेखील वाहतुकीसाठी खुले झाल्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. हवामान खात्याने मुंबईला पावसाच्या अनुषंगाने रेड अलर्ट दिला. मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे या जिल्ह्यांना आजही अति मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. नांदेड आणि सांगलीलाही अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे गरज असेल, तर घराबाहेर पडण्याचं आवाहन प्रशासनाने केलेलं (Mumbai News) आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.