Rain Update: कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा इशारा; ‘या’ भागात पडणार मुसळधार पाऊस

96
Rain Update: कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा इशारा; 'या' भागात पडणार मुसळधार पाऊस
Rain Update: कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा इशारा; 'या' भागात पडणार मुसळधार पाऊस

राज्यासह देशभर मान्सून सक्रिय झाला असून, देशातील बहुतांश भाग पावसाने व्यापला आहे. पुणे, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये पावसाचे हजेरी लावली आहे. तर घाट माथ्यावर जोरदार पाऊस होईल, अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे. दरम्यान, पुण्यात (Pune Rain) सायंकाळनंतर हलक्या ते मध्यम सरी कोसळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.  (Rain Update)

(हेही वाचा – येत्या काळात ‘सेक्युलर’ आणि ‘सोशलिस्ट’ शब्द घटनाविरोधी ठरवले जातील; Ad. Vishnu Shankar Jain यांचा दावा)

देशभरात मान्सून सक्रिय झाला असाल तरी, अद्याप हरियाणा, चंदीगड, पंजाब, हिमाचल प्रदेश आणि जम्मूचा काही भाग मॉन्सूनच्या प्रतीक्षेत आहेत. या भागात दोन दिवसांमध्ये मॉन्सून पोहोचेल आणि मग संपूर्ण देश मॉन्सूनने व्यापेल. दरम्यान, सध्या राज्यामध्ये पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. विदर्भात काही भागात पुढील ४ दिवस येलो अलर्ट (Yellow Alert) जारी करण्यात आला आहे. तसेच कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस होईल, असा इशाराही हवामान विभागाने दिला आहे.  (Rain Update)

(हेही वाचा – कोणताही खेळाडू शासकीय सेवेच्या लाभापासून वंचित राहणार नाही याची काळजी घेणार; Ajit Pawar यांचे आश्वासन)

शनिवारी कोसळणाऱ्या पावसाने लोणावळा ३७ मिमी, शिरगाव ४५ मिमी, अंबोणे १४४ मिमी, कोयना ३६ मिमी, खोपोली २६ मिमी, ताम्हिणी ५८ मिमी आणि भीरा येथे ५० मिमी पावसाची नोंद झाली आहे. (Rain Update)

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.