
हवामान खात्याने (IMD) शुक्रवारी (२१ फेब्रुवारी ) 13 राज्यांमध्ये पावसाचा अंदाज (Weather Update) वर्तवला आहे. मध्य प्रदेशात शुक्रवारपासून दिवस आणि रात्रीच्या तापमानात २ ते ३ अंशांनी घट होण्याची शक्यता वर्तवली आहे. तर ओडीशामध्ये पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा (Rain) इशारा देण्यात आला आहे. तसेच जोरदार वारा आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्य सरकारने 25 जिल्ह्यांमध्ये अलर्ट जारी केला आहे. (Weather Update)
हेही वाचा-SSC Exam : पहिल्याच दिवशी दहावीचा पेपर फुटला ; पेपरचे फोटो व्हायरल
दिल्ली (Delhi), पश्चिम बंगाल (West Bengal) आणि जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) गुरुवारी (२० फेब्रुवारी ) हलका पाऊस झाला. जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशच्या काही भागातही जोरदार हिमवृष्टी झाली. काश्मीरमध्ये बर्फवृष्टीमुळे जम्मू-श्रीनगर महामार्ग (Jammu-Srinagar highway) बंद करण्यात आला. यामुळे सुमारे ३०० वाहने अडकली. नाचिलाना, शेरबीबी आणि बनिहाल-काझीगुंड चारपदरी बोगद्यांमध्ये अडकलेल्या वाहनांना बाहेर काढण्यात येत आहे. (Weather Update)
हेही वाचा-LoC वरील गोळीबाराच्या घटनांनंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये फ्लॅग मिटिंग
महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. हिमाचल प्रदेशातील बहुतेक भागात पाऊस आणि बर्फवृष्टी झाल्यानंतर शुक्रवारी(दि.२१) पश्चिमी विक्षोभ कमकुवत होईल. आज(दि.२१), फक्त जास्त उंचीवर हलका हिमवर्षाव होऊ शकते. इतर भागात हवामान स्वच्छ राहिल. २२ फेब्रुवारी रोजी राज्यातील उंच आणि मध्यम उंचीच्या भागात हलका पाऊस आणि बर्फवृष्टी होऊ शकते. (Weather Update)
हेही वाचा-परदेशात MBBS करायचं असेल तरी NEET आवश्यक; MCI च्या नियमावर ‘सुप्रीम’ शिक्कामोर्तब
राजस्थानमध्ये वादळ आणि पाऊस थांबल्यानंतर तापमानात पुन्हा एकदा घट झाल्याने सौम्य थंडी वाढली. २२ फेब्रुवारीपासून हवामान पुन्हा एकदा बदलेल आणि तापमान २-३ अंश सेल्सिअसने वाढण्याची शक्यता आहे. २५-२६ फेब्रुवारीपर्यंत राज्यातील अनेक शहरांमध्ये दिवसाची उष्णता वाढू शकते. गेल्या 24 तासांत राजस्थानमध्ये हवामान स्वच्छ होते आणि गुरुवारी सर्व जिल्ह्यांमध्ये सूर्यप्रकाश होता. गुरुवारी रात्री उशिरा उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये सुमारे अर्धा तास गारपीट झाली. शुक्रवारी सकाळपासून गाझियाबाद, सहारनपूर आणि बुलंदशहरसह पश्चिम उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस पडत आहे. त्यामुळे कमाल तापमानात घट नोंदली गेली. (Weather Update)
गेल्या २४ तासांत पंजाबमध्ये झालेल्या पावसानंतर तापमानात घट झाली आहे. हवामान केंद्राच्या मते, गेल्या २४ तासांत सरासरी कमाल तापमान -४.७ अंश सेल्सिअसने कमी झाले आहे. तथापि, राज्यात हे सामान्यपेक्षा -१.८ अंश सेल्सिअस कमी आहे. राज्यातील सर्वाधिक कमाल तापमान भटिंडा येथे २५.१ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. (Weather Update)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community