समृद्धी महामार्गावर लावण्यात येत असलेल्या झाडांच्या संगोपनासाठी दोन शेततळी तयार केली आहेत. दोन्ही शेततळ्यांची एकूण पाणी साठवण क्षमता १ कोटी १८ लाख लिटर एवढी आहे. यातून माळीवाडा ते वैजापूरपर्यंत रस्त्याच्या मीडियनसह साइडला लावल्या जाणाऱ्या एक लाख ९८ हजार झाडांना ठिबकद्वारे पाणीपुरवठा केला जाणार आहे. माळीवाड्यातील इंटरचेंजमध्ये ही शेततळी आहेत. यातील एक समृद्धी महामार्गालगत (Samriddhi Highway), तर दुसरे तळे धुळे-सोलापूर महामार्गालगत असलेल्या एक्झिट पॉइंटला आहे.
(हेही वाचा – Earthquake Marathwada : मराठवाडा, विदर्भात भूकंपाचे धक्के; परभणी, हिंगोली, नांदेडसह वाशीममध्ये भीतीचे वातावरण)
कशी आहे व्यवस्था ?
समृद्धी महामार्गावरील पावसाचे पाणी साइड ड्रेनमध्ये येईल आणि साइड ड्रेनमधील पाणी थेट या शेततळ्यात येईल. त्यासाठी अंडरग्राउंड जलवाहिनीही टाकलेली आहे. शेततळ्याच्या मधोमध कडुनिंबाचे झाड आहे. तळे खोदताना त्याला इजा होऊ दिली नाही. झाडाच्या घेराला प्लास्टिक मल्चिंग करून संरक्षित केले आहे. गोलाकार इंटरचेंजमधील हे तळे आणि तळ्यातील झाड लक्ष वेधून घेते.
तळ्यातील कडुनिंबाचे झाड वाचवले
समृद्धी महामार्गावरील (Samriddhi Highway) माळीवाडा इंटरचेंजदरम्यान एमएसआरडीसीने हे शेततळे तयार केले आहे. एमएसआरडीसीने इंटरचेंजमधील जागेचा सदुपयोग करून पावसाचेच पाणी साठवून वर्षभर झाडांना पाणी देता येईल, अशी व्यवस्था केली आहे. ठिबक सिंचन पद्धतीने देणार सर्व झाडांना पाणी देता येणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community