पुण्यातील ऑरेंज अलर्ट फेल तर साता-यातील या शहरात दिवसभरात सर्वाधिक पाऊस

86

शुक्रवारी दिवसभरात पुण्यात आणि साता-यात अतिवृष्टीसाठी मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला होता. मात्र पुण्यात समाधानकारक पाऊस पडला नाही. साता-यात महाबळेश्वरमध्ये सर्वाधिक ५५ मिमी पावसाची नोंद झाली. शुक्रवारी राज्यातील सर्वात कमी किमान तापमानाची नोंदही महाबळेश्वरमध्ये झाली. महाबळेश्वरला १७.५ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवले गेले. राज्यात आता वरुणराजा पुन्हा विश्रांती घेणार असल्याचे संकेत मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने दिले आहेत. राज्यात सोमवारपर्यंत कुठल्याही भागांत अतिवृष्टीसाठी रेड किंवा ऑरेंज अलर्ट नसून, काही जिल्ह्यांत वीकेण्डला मुसळधार पावसाची शक्यता आहे.

( हेही वाचा : १५ ऑगस्टपासून राज्यात ‘महाराष्ट्र स्टार्टअप आणि नाविन्यता यात्रा’ )

या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी

रायगड जिल्ह्याला रविवारपर्यंत तर रत्नागिरीत रविवारी आणि सोमवारी मुसळधार पावसाची शक्यता मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवली आहे. दोन्ही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रात पुणे, कोल्हापूर आणि साता-यात सोमवारपर्यंत यलो अलर्टसह मुसळधार पावसाची शक्यता आहे. शनिवारी पुण्यात पाऊस पडण्याची शक्यता नाही. राज्यात मध्य महाराष्ट्राच्या उर्वरित भागांत तसेच मराठवाड्यात मंगळवारपर्यंत पावसाची शक्यता फारच कमी आहे.

विदर्भात पावसाची शक्यता कमी

विदर्भात रविवारपासून पाऊस पुन्हा सुरु होईल. चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदियात रविवारी मुसळधार पावसाला सुरुवात होईल. गोंदिया आणि नागपूरात रविवारीही मुसळधार पाऊस राहील. गडचिरोलीतील सोमवारी पाऊस पडण्याची शक्यता नाही येथे पुन्हा मंगळवारी मुसळधार पावसाला सुरुवात होईल. विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा दिलेल्या सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.