Monsoon Update: राज्यात सरासरीच्या ८९ टक्केच पाऊस

पावसाच्या विश्रांतीमुळे पाणी  चिंता, राज्य सरकारकडून नियोजनाच्या सूचना

128
Monsoon Update: राज्यात सरासरीच्या ८९ टक्केच पाऊस
Monsoon Update: राज्यात सरासरीच्या ८९ टक्केच पाऊस

राज्यात यंदा  आतापर्यंत  सरासरीच्या ८९ टक्के पाऊस  झाला आहे(Monsoon Update).  मागील वर्षी सरासरीच्या १२२.८  टक्के पाऊस झाला होता. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवारीपासून पावसात खंड पडला आहे. त्यामुळे पावसाने आणखी काही काळ विश्रांती घेतली तर  तर राज्याला पुढील काळात  पाणी टंचाईचा सामना करावा लागू शकतो.

शुक्रवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील पाऊसपाणी आणि खरीप हंगामातील पेरणीचा आढावा घेण्यात आला.  पुढील काही दिवसात हवामान विभागाने राज्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे.  याअनुषंगाने कृषी तसेच महसूल आणि  संबंधित विभागांनी नियोजन करावे. चारा, वैरण, पिण्याचे पाणी या अनुषंगाने योग्य ते नियोजन तयार ठेवावे,अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी  दिल्या.

कृषी विभागची माहिती

कृषी विभागाने बैठकीत दिलेल्या  माहितीनुसार  राज्यात १३९.३५  लाख हेक्टर क्षेत्रावर म्हणजेच ९१ टक्के पेरणी झाली आहे. १०० टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झालेले ६ जिल्हे असून, ७५ ते १०० टक्के पाऊस झालेले १३ जिल्हे आणि ५० ते ७५ टक्के पाऊस झालेले १५ जिल्हे आहेत.  राज्यात २५ ते ५० टक्के पाऊस झालेले १३ तालुके आहेत.

सध्या राज्यातील मोठे, मध्यम आणि  लघु पाटबंधारे प्रकल्पात ६१.९०  टक्के पाणी साठा असून गेल्या वर्षी याच सुमारास ८०.९०  टक्के पाणी साठा होता.  नागपूर विभागातील धरणांमध्ये सध्या ७०.४७  टक्के, अमरावती ६६.५७ टक्के, औरंगाबाद ३१.६५ टक्के, नाशिक ५७.१६ टक्के, पुणे ६८.२३ टक्के आणि कोकण ८७.२५ टक्के अशी पाणी साठ्याची स्थिती आहे. आजच्या घडीला  राज्यात ३२९ गावे आणि १२७३ वाड्यांमधून ३५१ टँकर्स सुरु आहेत.

हेही पहा –
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.