- ऋजुता लुकतुके
फेब्रुवारी २०२३ मध्ये गोदरेज कंपनीने ही जागा विकत घेतली होती. (Raj Kapoor Bungalow)
गोदरेज समुहातील बांधकाम क्षेत्रातील कंपनी गोदरेज प्रॉपर्टीज् लिमिटेडने चेंबूरमधील राज कपूर (Raj Kapoor) यांच्या बंगल्याची जागा फेब्रुवारी २०२३ मध्ये विकत घेतली होती. या जागेवर आता २ लाख वर्ग फुटांचा रहिवासी प्रकल्प उभा राहत आहे. आता सध्याच्या बाजार भावाने या संपूर्ण विकसित प्रकल्पाची किंमत अंदाजे ५०० कोटी रुपये इतकी होईल. कंपनीने नोव्हेंबर २०२३ मध्ये ही जागा विकसित करणार असल्याचं जाहीर केलं होतं. (Raj Kapoor Bungalow)
पण, आता प्रत्यक्ष कामाला सुरुवातही झाली आहे आणि येत्या २ वर्षांत इथं प्रकल्प उभा करण्याचा कंपनीचा मानस आहे. चेंबूरला देवनार फार्म रोडवर राज कपूर (Raj Kapoor) यांचा हा जुना बंगला होता. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोसळ सायन्सेस इमारतीजवळ हा बंगला होता. राज कपूर (Raj Kapoor) यांच्या वारसदारांकडून फेब्रुवारीत गोदरेज कंपनीने ही जागा विकत घेतली. (Raj Kapoor Bungalow)
(हेही वाचा – Parliament winter session 2023 : सलग दुसऱ्या दिवशी खासदारांचे निलंबन, सुप्रिया सुळेंसह ४९ खासदार निलंबित)
वसाहतीला गोदरेज आरकेएस नाव
आता या जागेचं पाडकामही पूर्ण झालं आहे आणि नवीन बांधकामाला सुरुवात झाली आहे. इथं उभी राहणारी वसाहत ही प्रिमिअम म्हणजे अत्युच्च दर्जाची असेल असं गोदरेज प्रॉपर्टीज् चे पिरोजशाह गोदरेज यांनी म्हटलं आहे. गोदरेज कंपनीनेच २०१९ मध्ये राज कपूर (Raj Kapoor) यांचा ऐतिहासिक आर के स्टुडिओ विकत घेतला होता. ही जागाही ते निवासी आणि व्यापारी संकुल विकसित करण्यासाठी वापरणार आहेत. तिथंही बांधकाम सुरू आहे. (Raj Kapoor Bungalow)
पण, स्टुडिओच्या जागी उभ्या राहत असलेल्या वसाहतीला त्यांनी गोदरेज आरकेएस (Godrej RKS) असं नाव दिलं आहे. यात राज कपूर स्टुडिओज ची अद्याक्षरं वापरली आहेत. येत्या काही दिवसांतच राज कपूर (Raj Kapoor) यांच्या बंगल्याच्या जागी होणाऱ्या बांधकामाची अधिकृत घोषणा होईल आणि तिथं नोंदणीही सुरू होईल. (Raj Kapoor Bungalow)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community