शिल्पा शेट्टीचा जबाब नोंदवला! पॉर्न व्हिडिओ प्रकरणी तपासाला गती

राज कुंद्रा याची शुक्रवारी पोलिस कोठडी संपल्यानंतर किल्ला न्यायालयाने त्याच्या पोलिस कोठडीत २७ जुलैपर्यंत वाढ केली

पॉर्न व्हिडिओ प्रकरणी अटक करण्यात आलेल्या राज कुंद्रा याच्या घराची झडती गुन्हे शाखेकडून घेण्यात आली. पोलिसांनी अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा राहत्या घरीच जबाब नोंदवून घेतला. घराच्या झडतीत पोलिसांनी लॅपटॉपसह काही महत्वाचा दस्तावेज ताब्यात घेतला आहे. राज कुंद्रा याची शुक्रवारी पोलिस कोठडी संपल्यानंतर किल्ला न्यायालयाने त्याच्या पोलिस कोठडीत २७ जुलैपर्यंत वाढ केली आहे.

शिल्पा शेट्टीचा जबाब नोंदवण्यात आला

पॉर्न व्हिडिओ तयार करण्यासाठी आर्थिक मदत केल्याप्रकरणी अभिनेत्री शिल्पा शेट्टी हीचा पती राज कुंद्रासह दोघांना प्रॉपर्टी सेलने अटक केली होती. शुक्रवारी त्याची पोलिस कोठडी संपल्यानंतर गुन्हे शाखेने त्याला किल्ला न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने दोघांच्या पोलिस कोठडीत २७ जुलैपर्यंत वाढ केली आहे. दरम्यान गुन्हे शाखेचे पथक राज कुंद्राला घेऊन त्याच्या घरी झडती घेण्यासाठी गेले होते. या प्रकरणात शिल्पा शेट्टी हीचा देखील या प्रकरणात जबाब नोंदवण्यात आला असल्याची माहिती गुन्हे शाखेने दिली आहे.

(हेही वाचा : राज्यभरात जलप्रलयाचे आतापर्यंत ८९ मृत्यू! मृतांच्या वारसांना पाच लाख रुपयांची मदत)

हॉटशॉट अँपमध्ये अश्लील, न्यूड कंटेंट मिळाला

तसेच राज कुंद्रा याच्या घरातून गुन्हे शाखेने लॅपटॉप आणि काही इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि गुन्ह्या संदर्भातील महत्वाचे कागदपत्रे आणि बँकेतील आर्थिक व्यवहार संदर्भातील पुरावे ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी राज कुंद्रा याच्या कार्यालयातून ताब्यात घेण्यात आलेले स्टोरेज अँटचड नेटवर्कचे तीन बॉक्समध्ये असलेल्या हॉटशॉट अँपमध्ये अश्लील आणि न्यूड कंटेंट मिळून आला आहे, तसेच राज कुंद्राच्या मोबाईलमध्ये यापूर्वी तयार केलेले १९९ अडल्ड फिल्म एका व्यक्तीस १.२ मिलियम डॉलरला विक्री करणार असल्याचे चॅट मिळालेले आहे, याबाबत करारनामा झाला असल्याचा संशय गुन्हे शाखेला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here